आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीत राम मंदिराचा मुद्दा नाही, गोव्यात भाजपची बैठक सुरु

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पणजी- भाजप आता हिंदुत्ववादाचा मार्ग सोडून एनडीए हाच धर्म असल्याचे मानू लागले आहे. भाजपच्या गोव्यात सुरु झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये हाच संदेश मिळत आहे. कारण अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा पक्षाच्या कार्यक्रम पत्रिकेवर असणार आहे, मात्र लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा नसेल, अशी स्पष्ट भूमिका भाजप घेत असल्याचे दिसून आले आहे.

भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नक्वी यांनी यबाबत सुतोवात करताना पत्रकारांना सांगितले की, राम मंदिराचा मुद्दा आमच्या कार्यक्रम पत्रिकेवर नाही, असे भाजपने कधीही म्हटलेले नाही. मात्र महागाई, भ्रष्टाचार आणि यूपीए सरकारची खराब कामगिरी हे मुद्दे आम्ही निवडणुकीच्यावेळी लोकांसमोर घेऊन जावू. वैचारिक दृष्टिकोनातून मंदिराच्या मुद्यावर आम्ही ठाम आहोत. मात्र गोव्यात भाजप राजकीय, अंतर्गत सुरक्षा आणि शेजारी देशांच्या संबंधी मुद्यावर विचार करणार असल्याचे नक्वी यांनी स्पष्ट केले. भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीची ३ दिवसीय बैठक कालपासून गोव्यात सुरू झाली असून येत्या लोकसभा निवडणुकीची व्यूहरचना त्यात ठरविली जात आहे.

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी करणे ही भाजपवर सक्ती नसून तो आमचा ‘धर्म’ आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या कारकीर्दीत भाजपने आपली विश्‍वासार्हता आणि स्थैर्य सिद्ध केले आहे. आम्ही आघाडी हा ‘धर्म’च मानतो. आगामी काळात ‘एनडीए’ची आघाडी अधिक मजबूत होऊन तिचा विस्तार होईल, असेही मुख्तार अब्बास नक्वी यांनी स्पष्ट केले.