आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Meeting In Goa, Narendra Modi To Publicity Leader To BJP In Loksabha Election

मोदींसाठी संघानेही वाढविला दबाव, वाजपेयींची प्रकृती खालावल्‍याची चर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पणजी- भाजपच्‍या राष्‍ट्रीय कार्यकारीणीच्‍या बैठकीत आज मोठी घोषणा होऊ शकते. त्‍याकडे राजकारण केंद्रीत झालेले असतानाच दिल्‍लीमध्‍ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावल्‍याची माहिती आहे. वाजपेयी यांच्‍या निवासस्‍थानाबाहेर गर्दी वाढू लागली आहे. मात्र, डॉक्‍टरांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही.

नरेंद्र मोदींकडे लोकसभा निवडणुकीच्‍या प्रचार समितीचे प्रमुखपद सोपविण्‍याबाबत दुपारी घोषणा होण्‍याची शक्‍यता आहे. पक्षाचे प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी सांगितले की, काही मिनिटांमध्‍येच एक चांगली बातमी मिळेल. भाजपचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष राजनाथ सिंह मोदींच्‍या नावाची काही घोषणा करु शकतात. भाजपच्‍या स्‍थापनेनंतर प्रथमच लालकृष्‍ण अडवाणी यांच्‍या अनुपस्थितीत कार्यकारीणीची बैठक होत आहे. अडवाणींचा विरोध लक्षात घेता, नरेंद्र मोदींना याच बैठकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार म्‍हणून घोषित करण्‍यात येऊ शकते, असे काही सुत्रांचे म्‍हणणे आहे.

भारतीय जनता पार्टीमध्‍ये नरेंद्र मोदी आणि लालकृष्‍ण अडवाणी यांच्‍यावरुन शीतयुद्ध सुरु आहे. त्‍यातच आता राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाने मोदींसाठी दबाव वाढविल्‍यामुळे आगीत तेल ओतण्‍याचे काम केले आहे. मोदींना लोकसभा निवडणुकीपर्यंत प्रचार समितीचे प्रमुख बनविण्‍यासाठी दबाव वाढत आहे. संघानेही मोदींची बाजू घेऊन दबाव वाढविला आहे. एकीकड अडवाणी यांच्‍या अनुपस्थितीत भाजपच्‍या संसदीय समितीच्‍या 3 सदस्‍यांनी मोदींच्‍या नावाची घोषणा करण्‍यास विरोध व्‍यक्त केला आहे. तर संघाने आजच मोदींच्‍या नावाची घोषणा करण्‍यासाठी आग्रह धरला आहे. संघाचे नेते सुरेशा सोनी गोव्‍यात दाखल झाले आहेत. तर विश्‍व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांनी अडवणी यांना मोदींना आशीर्वाद देण्‍याची विनंती केली आहे.


दोन दिवसांपासून भाजप कार्यकारिणी अधिवेशनात गैरहजर असलेले ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा विरोध झुगारून भाजप मार्गक्रमण करण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत नरेंद्र मोदी यांना प्रचार समितीचे प्रमुखपद सोपवण्याची तयारी भाजपने केली आहे. रविवारी त्याबाबत घोषणा होऊ शकते. त्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. मात्र परस्परविरोधी वक्तव्यांवरून त्याचे संकेत मिळत आहेत.

पहिल्यांदाच अडवाणी यांच्या गैरहजेरीत पक्ष कार्यकारिणीची बैठक पार पडत आहे. त्यांच्यासाठी दिल्लीत विशेष विमान सज्ज होते. मात्र ते आलेच नाहीत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते येऊ शकले नाहीत, रविवारीही येणार नाहीत, अशी सारवासारव राजनाथ यांनी केली. यानंतर जावडेकर यांनी या कार्यकारिणीची हॅपी एंडिंग होईल, अशी आशा व्यक्त केली.

दिल्लीत यशवंत सिन्हा यांनी मीडियाशी संवाद साधला. कोण म्हणतंय की मी आजारी आहे. मला इतरांसारखा ‘नमो’निया झालेला नाही. मी पूर्णत: तंदुरुस्त आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोदी समर्थक धडकले अडवाणींच्‍या घरासमोर... वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये...