आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरे पेटली असताना भाजप आमदार बच्चू सिंह बंशीवाल यांनी घेतली सेल्फी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- राजस्थानच्या भरतपूरजवळ बयानातील भाजप आमदार बच्चू सिंह बंशीवाल यांनी गावातील घरे पेटली असताना त्यासमोर सेल्फी घेतली. कच्च्या घरांना येथे आग लागली होती. घटनेची माहिती घेण्यासाठी बच्चू येथे आले असताना त्यांनी सेल्फी घेतल्याने लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी सेल्फी त्वरित फेसबुकवर पोस्ट करून कडीच केली.

लोकांनी प्रक्षोभ व्यक्त करत म्हटले की ‘आगीवर पाणी टाकले असते तर बरे होते.' त्यावर बच्चू यांनी उत्तर लिहिले की, मी अधिकाऱ्यांना फोन करून आगीविषयी माहिती दिली असती तर कदाचित त्यांनी त्वरित पावले उचलली नसती. त्यांना घटनेचे गांभीर्य समजावे म्हणून सेल्फी पोस्ट केली. मी घटनास्थळी आहे, तुम्ही देखील त्वरित या, असा संदेश मला द्यायचा होता.  मंगळवारी नगला मौरौली डांग परिसरात शेतात बांधलेल्या कच्च्या घरांमध्ये आग लागली. आगीत सर्व घरे बेचिराख झाली. बयानाचे आमदार बच्चू सिंह  घटनास्थळी पोहोचले. तेथील कुटुंब सदस्यांकडून त्यांनी माहिती घेतली.  या दरम्यान ते पेटत्या घरांसमोर उभे राहिले व सेल्फी घेतली. लोक हे दृश्य पाहून थक्क झाले. 
बातम्या आणखी आहेत...