आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोतर नेसून भाजप आमदार विष्णू वाघ पोहोचले विधानसभेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी- भाजप आमदार विष्णू वाघ यांनी गोवा विधानसभेच्या अधिवेशनाला आवर्जून धोतर नेसून हजेरी लावली. राज्यमंत्री सुदीन ढवळीकर यांनी समुद्र किनारी बिकिनीवर बंदी आणण्याची मागणी विधानसभेत केली होती. बिकिनी भारतीय संस्कृतीच्या विरुद्ध असल्याचेही ढवळीकर यांनी म्हटले होते. त्यावर विष्णू वाघ यांनी त्यांना संस्कृती रक्षणासाठी दररोज धोतर घालण्याचा सल्ला दिला होता. वाघ संस्कृती जतन करण्याच्या उद्देशाने धोतर घालून विधान भवनात आले व आपल्याकडे विविध प्रकारचे धोतर असल्याचे त्यांनी सांगितले. संस्कृती रक्षण हे वाणीतून नव्हे, तर कृतीतून करावे, असा सल्लाही त्यांनी ढवळीकरांना दिला. ढवळीकरांनी गोव्यातील पब व बिकिनीवर बंदी आणण्याची मागणी केली होती.