आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP MP Adityanath Target Mim Chief Owaisi Varanasi Latest News

भाजप खासदार आदित्यनाथ म्हणाले, मुस्लिमांना शिवी द्यायची असेल तर फक्त \'पाकी\' म्हणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी - भाजपचे फायर ब्रँड खासदार आदित्यनाथ यांनी 'एमआयएम' प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. हिंदूच्या वाटेला जावू नका, ते सगळ्यांचा निपटारा करु शकतात, असे खडे बोल त्यांनी सुनावले. ओवेसींचे नाव न घेता आदित्यनाथ म्हणाले, 'मौलाना कान उघडून ऐका आणि लक्षात ठेवा, जेव्हा हिंदू जागा होईल तेव्हा कुठेतरी रिक्षा चालवताना किंवा भांडी घासतानाच दिसाल.' रविवारी विश्व हिंदू परिषदेच्या 50व्या वर्धापनानिमीत्त आयोजित हिंदू महासंमेलनात ते बोलत होते.
आदित्यनाथ म्हणाले, की जगभरात मुस्लिमांकडे शंकेच्या नजरेने पाहिले जात आहे. युरोपात तर 'पाकी' हा शब्द शीवी समान उच्चारला जातो. या लोकांनी आज स्वतःला नेमके कुठे नेऊन ठेवले ते आकलनाच्या पलिकडे आहे. ओवेसींचे नाव न घेता, आधीच्या वक्त्याच्या भाषणाचा संदर्भ घेऊन आदित्यनाथ म्हणाले, 'काही लोक म्हणतात की आम्ही 98 कोटींचा निपटारा लावू. पण यांना प्रत्येकवेळी आपण पाहून घेतलेले आहे. टीपू सुलतानाचे वंशज आज कर्नाटकात रिक्शा चालवतात तर, कोलकत्यात बहादूरशहा जफरचे वंशज लोकांच्या घरी भांडी घासत आहेत. मौलाना कान उघडून ऐका, ज्या दिवशी हिंदू जागा होईल तेव्हा तेच दिवस पून्हा येतील. तुम्ही कुठेतरी रिक्शा चालवत नाही तर, भांडी घासत दिसाल.'
विहिंपचे प्रांत संघटन मंत्री मनोज श्रीवास्तव यांनी ओवेसींना आव्हान दिले. ते म्हणाले, देशभरात गोध्रा होऊ शकते. भारतात 98 कोटी हिंदू आहेत. एका-एका अलीवर पाच-पाच बजरंगी चढतील. लक्षात ठेवा अशोक सिंघल आणि आदित्यनाथ यांना दहशतवादी देखील घाबरतात.
संमेलनाचे संयोजक रणविजयसिंह म्हणाले, की हिंदू संघटीत झाले तेव्हाच ओबामा भारतात आले. विहिंपचे आणखी एक नेते मनोज म्हणाले, 'घरवापसी कार्यक्रमाने संसदेवर जणू डोंगर कोसळला होता. मुस्लिम मतांचे भिकारी देशाला बुडवायला निघाले आहेत. आझम खान, अबु सालेम, दाऊद हे सारे आयएसआयचे एजंट आहेत.' मनोज यांनी आझम खान आणि उत्तरप्रदेशातील अखिलेश यादव सरकारवर जोरदार टीका केली.
आदित्यनाथ यांचा ओबामा यांच्यावरही हल्लाबोल
खासदर आदित्यनाथ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यावरही शाब्दिक हल्ला चढवला. भारत दौर्‍यावर असताना ओबामांनी केलेल्या धार्मिक असहिष्णुतेचा समाचार घेताना आदित्यनाथ म्हणाले, हिंसक भारत नाही तर अमेरिका आहे. भारताला ओबामांच्या प्रमाणपत्राची गरज नाही. ओबामा भारत दौर्‍यावर आले असताना त्यांनी भारतात धार्मिक असहिष्णुता नसेल तर हा देश अधिक प्रगती करु शकतो असे म्हटले होते.