आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शत्रुघ्न सिन्हा भाजपवर नाराज? जदयूच्या तिकिटावर पत्नी लढणार बिहार निवडणूक!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: पत्नी पूनमसोबत शत्रुघ्न सिन्हा)
पाटणा- भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम सिन्हा या बिहार निवडणुकीच्या रिंगणार उतरण्याची शक्यता आहे. पूनम जदयूच्या तिकिटावर बिहार विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची दबक्या आवाजात राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. मात्र, या सिन्हा यांच्याकहून दुजोरा मिळू शकलेला नाही.
एका आठवड्यात नीतीशकुमारांना दोनदा भेटले शत्रुघ्न
शत्रुघ्न सिन्हा हे भाजप नेत्यांवर नाराज आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे, मुजफ्फरपूर येथे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला सिन्हा यांना डावलण्यात आले होते. त्यामुळे ‍ते नाराज झाले आहेत. पंतप्रधानांच्या सभेच्या दुसर्‍याच दिवशी म्हणजेच 26 जुलैला सिन्हा यांनी नीतीशकुमार यांची भेट घेतली होती. सिन्हा यांनी या भेटीत नीतीशकुमारांची भरभरुन प्रशंसा केली. नीतीश कुमार यांचा 'विकास पुरुष' म्हणून गौरवही केला.

'नीतीश कुमार यांच्यासोबत आपले कौटुंबिक नातेसंबंध असल्याचे सांगत सिन्हा यांनी मात्र या प्रकरणाला बगल दिली आहे. चार दिवसांपूर्वी दिल्लीला परत येताना पाटणा एअरपोर्टवर नीतीशकुमार यांची सिन्हा यांनी भेट घेतली होती. दोघांनी एकमेकांना हात दाखवत अभिवादन केले होते. नीतीश कुमार यांनी आपला ताफा थांबवून सिन्हा यांची भेट घेतली होती.

जदयूचे महासचिव के.सी.त्यागी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, राजकारणात कोणत्याही शक्यता नाकारता येत नाही. तसेच त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी जदयूत प्रवेश करणार असतील तर त्यांचे स्वागत आहे. त्यांच्या प्रवेशाने पक्षाची ताकद आणखी वाढेल. परंतु, सिन्हा यांच्याकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याचे, जदयूचे बिहारचे प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंह यांनी म्हटले आहे. सिन्हा यांनी जदयूमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केल्यास त्यांच्या पत्नीला विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यावर विचार करण्यात येईल, असेही वशिष्ठ नारायण सिंह यांनी म्हटले आहे.
शत्रुघ्न सिन्हा सत्य बोलत आहेत..
'बिहारी बाबू' अर्थात शत्रुघ्न सिन्हा सत्य बोलत आहेत. सिन्हा भाजप नेत्यांना कंटाळले आहे. तसेच पंतप्रधानांच्या बोचणार्‍या वक्तव्याने सिन्हा मागील काही दिवसांपासून नाराज दिसत आहेत. भाजपवर नाराज असलेले नेत्यांनी जदयूमध्ये प्रवेश केल्यास त्यांचे स्वागत करण्‍यात येईल, असेही वशिष्ठ नारायण सिन्हा यांनी म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...