पाटणा - अलीकडच्या काळात पक्षाच्या धोरणांवर सातत्याने टीका करणारे भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजप हा आपला पहिला आणि शेवटचा राजकीय पक्ष आहे, असा खुलासा केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मंगल पांडेश यांनी शॉटगन यांना राजीनामा देण्याचे आव्हान दिले होते. त्याला टि्वटरवर उत्तर देताना शत्रुघ्न म्हणाले, पंतप्रधान डॅशिंग, डायनामिक व अॅक्शन हीरो आहेत. तथापि, भाजप हा आपला पहिला व शेवटचा राजकीय पक्ष असेल.