आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BJP राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक दुसरा दिवस, UP च्या खासदारांना भेटणार शहा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलाहाबाद (उत्तर प्रदेश) - उत्तर प्रदेशात होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अलाहाबाद येथील के.पी.कॉलेज ग्राऊंडवर आयोजित भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले आहेत. आज (सोमवार) सायंकाळी ते एका सभेला संबोधित करतील. आज सकाळी भाजपचे अनेक बडे नेते संगमावर डुबकी मारण्यासाठी पोहोचले होते. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या या बैठकीस महाराष्ट्रातील महसूल मंत्री पदाचा राजीनामा दिलेले एकनाथ खडसे दिसत नसल्याने चर्चा सुरु आहे.

- बैठकीच्या दुसऱ्या दिवशी पक्षाध्यक्ष अमित शहा राज्यातील 71 खासदारांना भेटणार आहेत.
- रविवारी झालेल्या बैठकीत भाजपचे आगामी लक्ष्य उत्तर प्रदेश असल्यावर मंथन करण्यात आले.

- उत्तर प्रदेश विधानसभा लक्षात घेऊन मोदींनी केंद्रातील भाजप सरकारच्या द्विवर्षपूर्ती सोहळ्याला सहारनपूर येथून सुरुवात केली होती.
- त्यासोबतच नोएडामध्ये स्टँड अप इंडिया आणि बलिया येथून उज्ज्वला योजनेची सुरुवात केली होती.
- आज ते पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांना समाधानी न राहाता सध्याच्या राजकीय परिस्थितीची ओळख करुन देण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशात भाजपचा मार्ग अवघड
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक भाजपसाठी सोपी राहाणार नाही. कारण येथे पक्षाचे काही ठराविक व्होट बँक नाही.
- समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांना मात देण्यासाठी त्यांचे जातीआधारीत राजकारण प्रथम मोडीत काढावे लागणार आहे.

असे आहे भाजपचे राजकारण
- उत्तर प्रदेशात भाजपकडे मागासवर्गीय, सवर्ण असा कोणत्यात समाजातील प्रसिद्ध चेहरा नाही.
- केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार होण्याची ऑफर नाकारली आहे.
- त्यामुळे सध्या वरुण गांधी आणि स्मृती इराणी यांचे नाव चर्चेत आहे.
- भाजप समर्थकांनीही अनेक ठिकाणी वरुण यांचे पोस्टर्स आणि फ्लेक्स लावले आहेत. त्यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार करण्याची मागणी होत आहे.
- वास्तविक भाजप राष्ट्रीय सचिव सिद्धार्थनाथ सिंह म्हणाले, पोस्टर्स आणि जाहिराती हे कोणाच्याही लोकप्रियतेचा मापदंड असू शकत नाही.
शहा म्हणाले, केंद्रातही पुन्हा भाजपचीच सत्ता
दरम्यान, 2017 मध्ये उत्तर प्रदेशासह पंजाब, गुजरात, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणूक होत असून या निवडणुकीत भाजपच्या केंद्रीय सत्ताकाळात मिळवलेले यश लोकांपर्यंत पोहाेचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. मात्र, हे करत असताना पक्षासमोर असलेली आव्हानेही अमित शहा यांनी मांडली. उत्तर प्रदेशात भाजप सत्ता मिळवेल, असा विश्वास व्यक्त करून 2019 मध्ये केंद्रातही पुन्हा भाजपचीच सत्ता येईल, असा दावा शहा यांनी केला.
पुढील स्लाइडमध्ये, मुख्यमंत्रीपदाबाबत मौन..
बातम्या आणखी आहेत...