आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आतंकवाद आणि नक्षलवादातच अडकली भाजप राष्ट्रीय उपाध्यक्षांची गाडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू यांची पत्र परिषद आज (शुक्रवारी) महापौरांच्या रेल्वेस्टेशन येथील निवासस्थानी पार पडली. दिल्ली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासून उत्तरप्रदेश, उत्तराखंड मधील विधानसभा विजयाची गाथा त्यांनी वाचली. नगर जिल्ह्यातील अण्णा हजारेंमुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यशोशिखरावर गेले आणि नगर जिल्ह्यातील शाम जाजू यांनी दिल्ली मनपात त्यांचा दारूण पराभव केल्याचे सांगण्यास ते विसरले नाही. परंतु पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि नक्षलवाद रोखण्यात केंद्र आणि छत्तीसगड ही भाजप सरकार का यशस्वी होत नाही, यावर मात्र त्यांची गाडी अडकली. उपरोक्त प्रश्नावर त्यांनी वारंवार विषयांतर केले. अखेरीस सरकार गंभीरतेने विचार करीत असल्याचे सांगून त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करताना ठोस फॉर्मुलाही सांगितला नाही.

नोटाबंदीनंतर सर्वत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगाण सुरू आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांनी भाजपला मोठे यश मिळवून दिले. हे सर्व खरे असले तरी आतंकवाद आणि नक्षलवाद रोखण्यास कुठेच यश मिळताना दिसत नाही. या प्रश्नावर राष्ट्रीय उपाध्यक्ष जाजू यांनी प्रथमत: विषयांतर केले. नोटाबंदीनंतर आठ हजार कोटी रूपयांचे नक्षलवाद्यांचे बुडाले आणि कितीतरी लाख कोटी रूपये पाकिस्तानने तयार केलेल्या बनावट नोटांना कात्री लागल्याचे भाजपच्या वतीने बोलले गेले. त्याचे दृष्य स्वरूपात काहीच परिणाम जाणवत नाही. उरी हल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक झाले परंतु दहशतवाद फोफावत असून जवान धारातिर्थी पडत आहेत.  नक्षलवाद्यांनी   सुकमा जिल्ह्यात केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांना लक्ष केले. यावर मात्र शाम जाजू यांची चांगलीच पंचाईत झाली. नोटाबंदीचे सकारात्मक परिणाम स्वीकारूनही नकारात्मक परिणामांकडे दूर्लक्ष करताना त्यांची गाडी अडकली. केवळ सरकार गंभीर असल्याचे सांगून त्यांनी विषय मारून नेण्यावरच भर दिला.

राजकारण नियमाने चालत नाही
राजकारण हे कुठल्याही नियमाने चालत नसल्याचे सांगत प्रत्येक निवडणुकीत नवीन प्रयोग करावा लागतो. प्राप्त परिस्थिती आणि प्रसंगानुसार निर्णय घ्यावे लागतात. दिल्ली महापालिका निवडणुकीत १४० नवीन उमेदवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. केवळ एकच बंडखोर भाजपचा या निवडणुकीत विजयी झाल्याचा दावा त्यांनी केला. दिल्ली मनपा निवडणुकीतील मतांची तुलना विधानसभेशी केल्यास सत्तर पैकी ६८ जागांवर भाजप पुढे असल्याचे त्यांनी सांगितले. हे सुत्र प्रत्येक निवडणुकीसाठी लागू केले जाऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.

मराठी माणूस दिल्लीत यशस्वी
अनेक वर्षानंतर दिल्लीत मराठी माणूस ताल ठोकूण असल्याचे त्यांनी सांगितले. जाजू यांच्याकडे दिल्ली महापालिका निवडणुकीची जबाबदारी होती. तत्पूर्वी उत्तराखंड निवडणुकीत त्यांनी काम केले. उत्तराखंडमध्ये ऐतिहासिक विजय मिळवून दिल्याचे सांगताना त्यांनी मराठी माणूस सर्व पक्षांमध्ये दिल्लीत टिकला नाही . आपण एकमेव उदाहरण आहोत की, दिल्लीत टिकलो आणि पक्षाला मोठे यशही मिळवून दिले.  केजरीवाल यांना नगर जिल्ह्यातील अण्णा हजारे यांनीच यशोशिखरावर नेले आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकीत खालीही आणले. जाजू मुळचे नगर जिल्ह्यातील संगमनेर येथील आहेत.

प्रस्थापित समाजाचा सुदारणेला विरोध
तीन तलाकच्या प्रश्नावर मुस्लिम समाजाचा विरोध असणे स्वाभाविक असल्याचे जाजू यांनी सांगताना, कुठल्याही प्रस्थापित समाजाचा सुधारणेला विरोध असतो. परंतु उपरोक्त मुद्यामुळे गरीब, मध्यमवर्गीय , कष्टकरी मुस्लिम समाज भाजपच्या पाठीशा आहे. प्रस्थापित मुस्लिम समाजाचा विरोध असला तरी महिला व सर्वसामान्य समाजातील घटकांची मते भाजपला मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. हळूहळू मुस्लिम समाजाचा विरोध मावळेल. भाजप आपल्या मुद्यावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, महापौर भगवान घडमोडे, नगरसेवक गजानन बारवाल, दिलीप थोरात, बाळासाहेब गायकवाड आदींची उपस्थिती होती.
बातम्या आणखी आहेत...