आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती-दीर तुरुंगात, नीलम जाणार विधानभवनात; गाव-खेड्यात जाऊन असा केला प्रचार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पती खूनाच्या आरोपात तुरुंगात  आहे. नीलम विधानसभेत जाणार. - Divya Marathi
पती खूनाच्या आरोपात तुरुंगात आहे. नीलम विधानसभेत जाणार.
अलाहाबाद - उत्तर प्रदेशातील राजकारणावर मजबूत पकड ठेवून असलेल्या माफिया आणि बाहुबली राजकारणी अशी ओळख असलेल्या करवरिया कुटुंबातील तीन भाऊ तुरुंगात आहे. या कुटुंबाची सून नीलम करवरिया आता उत्तरप्रेदश विधानसभेत जाणार आहे. बाहुबली नेता उदयभान करवरिया यांची पत्नी नीलम करवरिया 20 हजार मतांनी विजयी झाल्या आहेत. भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढलेल्या नीलम यांना 67,807 मते मिळाली. त्यांच्या पतीपासून जेठ आणि दीर सर्व तुरुंगात कैद आहेत. त्यानंतरही भाजपने त्यांना तिकीट दिले आणि त्या बहुमताने विजयी झाल्या आहेत. 
 
घर-संसाराची जबाबदारी जरा बाजूला सारुन नीलम राजकारणाच्या मैदानात उतरल्या होत्या. त्यांनी भारतीय जनता पक्षाकडून तिकिट मिळविण्यासाठी आधीपासून व्यवस्थित फिल्डिंग लावली होती. मेजा विधानसभा मतदारसंघातून भाजपने त्यांना तिकिट दिले होते. ते त्यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवून योग्य ठरवून दिले. मात्र त्यांच्या कुटुंबावर असलेला माफिया आणि गुंडगिरीचा शिक्का पार्टी विथ डिफरन्स कसा पुसणार हाही प्रश्न उपस्थित होत आहे. 
 
एका गोष्टीचा राग येऊन सोडली कोठी, गावात आली राहायला
- नीलम करवरिया या बाहुबली उदयभान करवरिया यांची पत्नी आहे. 
- त्यांच्याकडे 4.63 कोटी रुपयांचे 8 बंगले आणि फ्लॅट आहेत. 
- एवढी संपत्ती आणि लक्झरी लाइफ असताना त्या मेजा विधानसभा मतदारसंघात एका छोट्या घरात राहात होत्या.
- त्यांनी गल्ली-बोळात जाऊन प्रचाराची राळ उडवून दिली.  
- नीलम प्रचाराचे काम त्यांच्या लक्झरी बंगल्यात राहूनही करु शकत होत्या. मात्र एकदा त्यांना त्या 'मतदारसंघाबाहेरील' असल्याचा टोमणा मारण्यात आला होता, याचा राग येऊन त्यांनी भलीमोठी कोठी सोडून मतदारसंघात छोट्या घरात राहाण्याचा निर्णय घेतला. 
- विरोधकांनी त्या 'बाहरी' असल्याचा प्रचार सुरु केला होता. त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलेल होते. 
 
नैनी सेंट्रल जेलमध्ये पती, जेठ आणि दिर 
- नीलम यांचे पती उद्यभान, जेठ कपील मुनी आणि दिर सूरजभान हे तिघे भाऊ नैनी सेंट्रल जेलमध्ये आहेत. 
- त्यांच्यावर समाजवादी पक्षाचे खासदार जवाहर यादव उर्फ पंडितजी यांच्या हत्येचा आरोप आहे. 
- कपील मुनी 2009 मध्ये फुलपूर येथून बहुजन समाज पक्षाचे खासदार होते. 
- उदयभान 2007 मध्ये बारा येथून भाजपचे आमदार होते. तर, सूरजभान बसपाकडून एमएलसी  होते. 
 
नीलमचे सासर-माहेर राजकारणी 
- नीलमच्या सासरी सर्वजण विविध राजकीय पक्षाकडून लोकसभा आणि विधानसभा, विधानपरिषद सदस्य होते तर माहेर देखील राजकारणी घराणे आहे. 
- नीलम यांना राजकारण वारशात मिळाले असे म्हटल्यास वावगे होणार नाही. त्यांचे वडील दिवंगत शिव नरेश मिश्रा तीन वेळा (राजापूर, कर्वी आणि चित्रकूट येथून) काँग्रेसचे आमदार होते.
- नीलम यांनी हिंदी साहित्यात एमए केले आहे. 
- नीलम यांचे पती 2002 मध्ये बसपाच्या रामसेवक पटेल यांना पराभूत करुन आमदार झाले होते.  
- 2012 मध्ये भाजपचे डॉ. नरेंद्र सिंह गौर यांचे तिकीट कापले गेले आणि उदयभान यांना अलाहाबाद उत्तर मधून संधी मिळाली होती. यावेळी त्यांचा पराभव झाला होता. 

समाजवादीच्या बालेकिल्ल्यात मारली मुसंडी  
- मेजा विधानसभा मतदारसंघ सपाचा पारंपरिक मतदारसंघ मानला जात होता.
- येथे सध्या सपाचे गिरीशचंद्र उर्फ गामा पांडे आमदार होते. यावेळी अखिलेश यांनी राम सेवकसिंह यांना उमेदवारी दिली होती.
- ब्राम्हण बाहुल्य असलेल्या या मतदारसंघातून नीलम भाजपच्या तिकिटावर 20 हजारांपेक्षा जास्त मतांनी विजयी झाल्या.  
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, पती उदयभानसोबत लग्नाचा वाढदिवस साजरा करताना नीलम...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...