Home »National »Other State» BJP Oath Ceremony Program In Lucknow News And Updates

योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री;15 वर्षांनंतर सरकारमध्ये 1 मुस्लिम मंत्री, 61% नवे चेहरे!

दिव्य मराठी वेब टीम | Mar 20, 2017, 03:39 AM IST

लखनऊ -यूपीत योगी सरकारचा चेहरा रविवारी स्पष्ट झाला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, २ उप्रमुख्यमंत्र्यांसह ४७ मंत्र्यांनी शपथ घेतली. मोहसीन रझांचा समावेश आश्चर्यकारक ठरला. त्यांनी ईश्वराला स्मरून शपथ घेतली. २००२ मध्ये राजनाथसिंह सरकारमध्ये केवळ एक मुस्लिम मंत्री होता. तर अखिलेश मंत्रिमंडळात १५ मुस्लिम मंत्री होते. योगी सरकारमध्ये १९% बाहेरचे व ६१% मंत्री नवे चेहरे आहेत.
हे घडले प्रथमच... मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यात मुलायम व अखिलेश व्यासपीठावर होते. त्यांनी पंतप्रधान मोदींशी हस्तांदोलन तर केलेच, शिवाय मुलायम यांनी मोदींशी कानगोष्टीही केल्या. यानंतर मोदींनी अखिलेश यांची पाठ थोपटली. मायावती व काँग्रेसचे नेते अनुपस्थित राहिले.
मुख्यमंत्री
योगी आदित्यनाथ
उपमुख्यमंत्री
केशव प्रसाद मौर्य
दिनेश शर्मा
कॅबिनेट मंत्री
1 - सूर्यप्रताप शाही
2 - सुरेश खन्ना
3 - स्वामी प्रसाद मौर्य
- बहुजन समाज पक्ष सोडून भाजपमध्ये आले होते.
4 - सतीश महाना
- भाजपचे ज्येष्ठ नेते. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतही यांचे नाव होते. कानपूरमधून सलग सातव्यांदा आमदार.
5 - राजेश अग्रवाल
6 - रीता बहुगुणा - जोशी
- काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. लखनऊ कँट येथून मुलायमसिंहांची सून अपर्णा प्रतिक यादव यांना पराभूत केले.
7 - दारासिंह चौहान
- बसपामधून भाजपमध्ये आले आहेत. मायावतींनी दलित आणि मुस्लीमांसोबत ओबीसींना जोडले होते त्यातील दारासिंह हे ओबीसी नेते होते.
8 - धर्मपाल सिंह
- आवंला मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजयी. धर्मपाल हे भाजपमधील मागासवर्गीय चेहरा आहे.
9 - एस.पी.सिंह बघेल
- टुंडला येथून आमदार. समाजवादी पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला.
10 - सत्यदेव पचौरी
- कानपूरमधील गोविंदनगर मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजयी.
मोदी-शहा यांच्यासह समाजवादी पक्षाचे नेतेही उपस्थित
देशातील सर्वात मोठ्या राज्यात भारतीय जनता पक्ष 15 वर्षांचा वनवास संपवून पुन्हा सत्तारुढ झाले आहे. शपथग्रहण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासह केंद्रीय मंत्री राजनाथसिंह, समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव मावळते मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. समारंभाला भाजपच्या सहकारी पक्षांच्या नेत्यांनाही निमंत्रित करण्यात आले होते.
9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
1# मध्य प्रदेश- शिवराज सिंह चौहान
2# गोवा- मनोहर पर्रीकर
3# महाराष्ट्र- देवेंद्र फड़णवीस
4# आंध्र प्रदेश- चंद्रबाबू नायडू
5# अरुणाचल प्रदेश- पेमा खांडू
6# छत्तीसगढ़- डॉ. रमन सिंह
7# आसाम- सर्वानंद सोनोवाल
8# गुजरात- विजय रूपानी
9# उत्तराखंड- त्रिवेंद्र सिंह रावत
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अचानक पुढे निघाले योगी आदित्यनाथ
- उत्तर प्रदेश मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत योगी आदित्यनाथ हे सुरुवातीपासून होते. मात्र त्यांचे नाव फार जोरकसपणे पुढे आले नव्हते.
- भाजपचे फायरब्रँड नेते आणि कट्टर हिंदूत्ववादी अशी प्रतिमा असलेले 44 वर्षांचे योगी आदित्यनाथ यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी शनिवारी निवड झाली. त्याच्या अवघे दोन तास आधी ते या स्पर्धेत सर्वात पुढे निघून गेले.
- उत्तर प्रदेशातील पहिले आणि उमा भारतीनंतर देशातील दुसरे भगवी वस्त्रे परिधान करणारे मुख्यमंत्री म्हणून ते ओळखळे जातील.
- दुसरीकडे उत्तर प्रदेशात प्रथमच दोन-दोन उपमुख्यमंत्री करण्याचीही ही पहिली वेळ आहे. केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील.
योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री का ?
- राजकीय विश्लेषक श्रीधर अग्नीहोत्री यांनी योगी आदित्यनाथ यांच्या निवडीची 10 कारणे सांगितली आहेत.
1- कट्टर हिंदूत्ववादी चेहरा आहे. भाजपचे फायरब्रँड नेते.
2 - राममंदिर आंदोलनातून पुढे आलेले नेतृत्व. राम मंदिरचा मुद्दा अधिक प्रखरपणे उचलतात.
3 - 2019 लोकसभा निवडणुकीला समोर ठेवून योगी आदित्यनाथ यांची निवड मानली जात आहे. या विधानसभा निवडणुकीत ज्या प्रकारे धार्मिक ध्रुविकरण करण्यात भाजपला यश आले हेच समीकरण 2019 मध्येही कायम राहील असे मानले जाते.
4 - या निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांनी पश्चिम यूपीपासून पूर्वांचलपर्यंत जोरदार प्रचार केला होता. याचाच फायदा भाजपला झाल्याचे मानले जाते.
5 - भाजपला जी मते मिळाली आहे, त्यात हिंदूत्वाचा अजेंडा अधिक गडद होता.
6 - आदित्यनाथ यांच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही.
7 - योगींचा स्वतःचा असा कोणताही गट नाही.
8 - पूर्वांचलमध्ये आदित्यनाथ यांची चांगली पकड आहे. या भागावर मोदी, शहा आणि राजनाथ यांचेही विशेष प्रेम आहे.
9 - गोरखपूरमधून पाचवेळा खासदार राहिले आहेत. संसदीय राजकारणाचा अनुभव आहे.
10 - राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे जवळचे मानले जातात. त्यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
स्वाती सिंह यांना मंत्रिमंडळात स्थान, पंकज यांना नाही दिले महत्त्व
- योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात स्वातीसिंह यांना कॅबिनेट दर्जा देण्यात आला आहे. मायावती यांच्याबद्दल अपशब्दांचा वापर करणारे भाजप नेते द्याशंकर सिंह यांच्या त्या पत्नी आहेत.
- मायावतींबद्दल अपशब्दांचा वापर केल्याबद्दल पक्षाने त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले होते. मात्र त्याचवेळी स्वाती यांनी मायावतींविरोधात मोर्चा उघडाला होता. त्याचे फळ त्यांना मिळाले आहे. या वादातून भाजपला एक महिला नेता मिळाली असेही म्हटले जात आहे. स्वातीसिंह विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या पतीवरील निलंबन पक्षाने मागे घेतले आहे.
- राजनाथ सिंह यांचे चिरंजीव पंकज सिंह नोएडा मतदारसंघातून विजयी झाले आहे. त्यांना योगींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांचे नातू मात्र मंत्रिमंडळात दिसणार आहे.
एकाही मुस्लिमाला दिली नाही उमेदवारी, बनवले मंत्री
- भाजपने उत्तर प्रदेशातील संपूर्ण 403 जागा लढवल्या होत्या परंतू एकाही मुस्लिम व्यक्तीला पक्षाने उमेदवारी दिली नव्हती. योगींच्या मंत्रिमंडळात मात्र एक मुस्लिम चेहरा राहणार आहे. त्यांचे नाव आहे मोहसीन रजा.
- मोहसीन रजा भाजप प्रवक्ते असून ते दोन्ही सभागृहांचे सदस्य नाहीत. आता त्यांना विधानसभेवर निवडून आणले जाते की विधानपरिषदेत स्थान दिले जाते हे पाहाणे उत्सूकतेचे राहाणार आहे.
देशात ५ अविवाहित मुख्यमंत्री
आदित्यनाथ (उप्र), खट्टर (हरियाणा), बीरेन (मणिपूर), ममता बॅनर्जी (प. बंगाल), नवीन (ओरिसा).
२९ नेते प्रथमच झाले मुख्यमंत्री. मंत्रिमंडळाच्या ६१%
५ मंत्री नेत्यांच्या कुटुंबातील, मंत्रिमंडळाच्या ०९%
५५ वर्षे सरासरी वय २६ वर्षाचे संदीपसिंह सर्वात तरुण. ७३ वर्षीय राजेश अग्रवाल ज्येष्ठ.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, योगींनी केले विमानतळावर मोदींचे स्वागत..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended