आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुवनेश्वरमध्ये पंतप्रधान मोदींचा रोड शो, आेडिशात 20 वर्षांनंतर भाजपची बैठक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुवनेश्वर- भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला शनिवारी आेडिशात सुरुवात झाली. २० वर्षांनंतर राज्यात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड-शो केला. दीड तास चाललेल्या रोड-शोमध्ये हजारो लोकांची गर्दी पाहायला मिळाली. 

आेडिशासह पूर्वेकडील राज्यांत भाजपचा प्रबाव वाढवण्यासाठी तयार करण्यात आलेली रणनीती राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा बैठकीत मांडतील. अलीकडे ग्रामीण आेडिशातील निवडणुकीत भाजपने अतिशय चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत भाजप आेडिशात सत्तेवर येईल, असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते वेंकय्या नायडू यांनी व्यक्त केला. बैठकीच्या पार्श्वभूमीवर नायडू पत्रकारांशी बोलत होते. आेडिशातील पंचायत निवडणुकीत भाजपला २९७ जागी विजय मिळाला होता. 
 
अमित शहा म्हणाले, आराम करायचा नाही.. 
केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी सांगितले, अमित शहांनी बैठकीत म्हटले की, आपल्याला आराम करायचा नाही. तर बूथ लेव्हलपर्यंत संघटना बांधणी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. काही लोक पराभवाची कारणे देण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यातूनच ईव्हीएमची चर्चा सुरू आहे. 
 
भाजपच्या अजेंड्यावर ओडिशा 
> मोदी दुपारी 3:30 च्या सुमारास भुवनेश्वर​ एअरपोर्टवर पोहोचले. 
> याठिकाणी स्वागतानंतर मोदी त्याठिकाणी उपस्थित असलेल्यांना भेटले. 
> मोदींनी याठिकाणी अनेक लोकांकडून स्वागत स्वीकारले. 
> त्यानंतर मोदींनी रोड शोमध्ये सहभाग घेतला. काहीवेळ ते गाडीच्या दाराजवळच उभे होते. दरम्यान ते अनेक लोकांना भेटले. 
> चारच्या सुमारास मोदी गव्हर्नर हाऊसला पोहोचले. याठिकाणी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांची भेट घेतली. 
> पाचच्या सुमारास मोदी जादवपूरला पोहोचले. याठिकाणी गाडीच्या खाली उतरून काही लोकांना भेटले. काही अंतरापर्यंत पायीही चालले. 
> जनता मैदानात रोड शो संपला. 
> रोड शोनंतर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटो आणि व्हिडिओ....
बातम्या आणखी आहेत...