आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Oppose Inforce Religion Conversion Amit Shah

बळजबरीने केल्या जाणा-या धर्मांतराला भाजपचा विरोध - अमित शहा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोची - बळजबरीने केल्या जाणा-या धर्मांतराला भाजपचा विरोध आहे. देशात धर्मांतरविरोधी कायदा लागू करावा, त्याला सर्व तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांनी पाठिंबा द्यावा, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले. विशेष म्हणजे धर्मांतराच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी संसदेत सरकारला कोंडीत पकडले आहे. शहा म्हणाले, बळजबरीच्या धर्मांतराला विरोधी करणारा भाजप हा देशातील एकमेव पक्ष आहे. तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांनी धर्मांतरविरोधी कायद्याला पाठिंबा द्यावा.
याबाबतीत राजकीय एकमत झाल्यास सार्वजनिक चर्चा केली जाऊ शकते. उत्तर प्रदेशात एका हिंदुत्ववादी संघटनेकडून सुरू असलेल्या घर वापसी कार्यक्रमावरील प्रश्नावर ते म्हणाले, सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे त्यावर निकाल येईपर्यंत आपण टिप्पणी करणार नाही.

भारत हिंदू राष्ट्र करू - मोहन भागवत
कोलकाता | धर्मांतरावरून उद्भवलेल्या वादातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी धर्मांतर होतच राहील, असे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, हिंदू धर्मातून भरकटलेल्या लोकांना पुन्हा स्वधर्मात आणणे सुरूच राहील. एखाद्या व्यक्तीला ते आवडत नसेल तर धर्मांतर रोखण्यासाठी त्यांनी कायदा तयार करावा. तरुणांचे तारुण्य जाण्यापूर्वी भारताला हिंदू राष्ट्र बनवूनच राहू, असेही सरसंघचालक म्हणाले. विश्व हिंदू संमेलनाला संबोधित करताना भागवत म्हणाले, आम्ही धर्मांतरासाठी बाहेर पडलेलो नाही. मात्र, हिंदू परिवर्तन करत नसतील तर हिंदू धर्म कधीच बदलणार नाही. आम्ही घुसखोर नाही, हा आमचा देश आहे, आमचे हिंदू राष्ट्र. हिंदू जागृत होत आहेत. इतर धर्मियांनी हिंदू धर्म स्वीकारण्याला विरोध करणा-यांनी आधी हिंदूंचे दुस-या धर्मात होणारे परिवर्तन रोखावे.