आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदी सरकारने परत आणला Black Money, भाजपच्या खासदारांचा वादग्रस्त दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाडमेर- काळ्या पैशाच्या (ब्लॅकमनी) मुद्द्यावरून मोदी सरकार आणि विरोधकांमध्ये वाद सुरु असताना भाजपच्या एका खासदाराने खळबळजनक दावा केला आहे. परदेशात असलेल्या काळ्यापैशापैकी एक लाख कोटी रुपये मोदी सरकारने देशात परत आणल्याचा दावा राजस्थानातील बाडमेरचे खासदार कर्नल सोनाराम चौधरी यांनी केला आहे. परंतु, सरकारने अजुन याबाबत काहीच सांगितले नाही, असेही खासदार चौधरी यांनी म्हटले आहे.
मोदी सरकारच्या वर्षपुर्तीनिमित्त कामकाजाचा लेखाजोखा मांडताना खासदार सोनाराम चौधरी बोलत होते. ''सरकारने एक लाख कोटी रुपये (काळा पैसा) देशात परत आणला आहे. परंतु, सरकारने अद्याप यावर कोणतेही भाष्य केलेले नाही. आपल्याकडे यासंदर्भात सर्व आकडेवारी असल्याचा दावा देखील खासदार चौधरी यांनी केला आहे.

खासदार चौधरी यापूर्वी कॉंग्रेसमध्ये होते. मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या सांगण्यावरून चौधरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, स्विस बँकेत खाते असणारे यश बिर्ला यांच्यासह सात नवी नावे उघड