आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP President Amit Shah Comment On Congress Voice President Rahul Gandhi

राहुल जिथे जातात तिथे काँग्रेचा सफाया; अमित शहा यांची टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची- काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी जेथे जातात तेथे काँग्रेसचा सफाया निश्चित असतो. आता झारखंडमध्ये ते प्रचाराला येतील तर येथेही पक्षाचा पराभव नक्की आहे, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली.

झारखंडमध्ये भाजपचे नेते अमित शहा व गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी एकाच दिवसांत आठ सभा घेऊन पक्षाचे प्रचार अभियान सुरू केले. यात शहा यांनी राहुल गांधींवर टीकेची झोड उठवली. तर राजनाथ सिंह यांनी राज्यातील नक्षलवाद्यांना हिंसाचाराचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केले. यापूर्वी पाकिस्तान भारतीय जवानांवर हल्ले करत होते. तेव्हा काँग्रेस सरकारने बीएसएफला पांढरे निशान फडकवून चर्चा करण्यास सांगितले. १६ वेळा त्यांनी पांढरे निशान फडकावले. परंतु आम्ही बीएसएफला सांिगतले की पाक युद्धबंदी मोडत असेल तर सडेतोड प्रत्युत्तर द्या. त्याला घाबरून पाक यूएनमध्ये पळून गेल्याचा दावा त्यांनी केला.
सिंह यांनी केला.