आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bjp President Amit Shah Lucknow Visit Latest News

अमित शहा UP दौ-यावर, कायदा सुव्यवस्थेचा खेळ केल्यास कायद्यानुसार कारवाई-सपा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांकडून स्वागत स्वीकारताना अमित शहा.

लखनऊ - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनल्यानंतर अमित शहा मंगळवारी प्रथमच उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये आले. शहा यांचा हा दौरा 13 सप्टेंबर रोजी होणा-या पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा असा मानला जात आहे. ते राज्याच्या दोन दिवसांच्या दौ-यावर आहेत. बुधवारी अमित शहा वाराणसीला जाणार आहेत. त्याठिकाणी ते पंतप्रधानांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करतील. राज्यातील सत्ताधारी समाजवादी पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी धमकीच्या स्वरात इशारा दिला आहे. कोणी कोणत्याही ठिकाणी जावे, पण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.

यापूर्वी अमित शहा यांच्या लखनऊ दौ-याने उत्साह वाढलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे भव्य स्वागत केले. केंद्रिय लघु उद्योगमंत्री कलराज मिश्र, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी, उपाध्यक्ष डॉ.दिनेश शर्मा यांच्यासह पक्षातील अनेक मोठे नेते त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. शहा सकाळी 10 च्या सुमारास विमानतळावर पोहोचले. सुमारे पाच हजार कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी त्याठिकाणी उपस्थित होते. येथून ते भाजप कार्यालयाकडे रवाना झाले. शहा यांनी भाजप कार्यालयात पोहोचल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबर चर्चा केली. त्यांनी पोटनिवडणुकीचा आढावाही घेतला. या दरम्यान 13 सप्टेंबरला विधानसभेच्या 11 जागा आणि मैनपुरी लोकसभा मतदारसंघात होणा-या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे निर्देश दिले आहेत.

पुढे पाहा, अमित शहा यांच्या स्वागताचे काही PHOTO