आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bjp President Keshav Prasad Maurya Welcome In Kanpur

यूपी भाजपाध्यक्षांची 21000 नाण्यांनी झाली तुला...तर 7 वर्षांचा तुरुंगवास?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपूर- उत्तर प्रदेशचे भाजपचे अध्यक्ष केशव प्रसाद मौर्य एका वेगळ्या प्रकरणात अडकण्याची शक्यता आहे. मौर्य यांची मंगळवारी (19 एप्रिल) 21 हजार नाण्यांनी तुला करण्यात आली. मोर्य यांना तराजूच्या एका पारड्यात बसवण्यात आले. दुसर्‍या पारड्यात एक-एक रुपयांचे 21 हजार नाणे ठेवण्यात आले. मात्र, मोर्य यांचे वजन 96 किलोपेक्षा जास्त आहे. परिणामी मौर्य यांनी या प्रकारामुळे टीकेची झोड उठण्यापूर्वी प्रेस कॉन्फ्रन्समध्ये जाहीर माफी मागितली आहे.

असा कार्यक्रम आयोजित करू नये...
- केशव प्रसाद मौर्य यांनी झालेगेले प्रकाराची जाहीर माफी मागितली आहे. तसेच पक्ष कार्यकर्त्यांनी यापुढे असा कार्यक्रम आयोजित न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नेमका काय झाला प्रकार...?
- कानपूरमधील नौबस्ता चौकात मौर्य यांची नाणेतुला करण्‍यात आली. यासाठी एक-एक रुपयांचे 21 हजार नाणे जमा करण्‍यात आली होती.
- सर्व नाणे लाल कापडाच्या पिशवीत बांधण्यात आले होते. मौर्य यांचे एकूण वजन 96 कि‍लोग्राम आहे.
- पक्ष कार्यकर्त्यानी शहरातील इतर लोकांकडून एक रुपयाचे नाणे जमा केले होते. नाणे जमा करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागला.
- कार्यक्रमानंतर एक रुपयाची 21 हजार नाणे पक्ष निधी म्हणून जमा करण्‍यात आलेल्या सूत्रांनी सांगितले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, नाण्यांचा बेकायदा वापर केल्यास 7 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा...