आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Prime Ministerial Candidate Narendra Modi’S Rally In Kolkata

नरेंद्र मोदींची ममतांवर ममता, \'तिसरी आघाडी देशाला तिस-या क्रमांकावर घेऊन जाईल\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी कोलकाताच्या एतिहासिक ब्रिगेड परेड मैदानावर 'जनचेतना रॅली'ला संबोधीत केले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्यावर नाव न घेता त्यांनी टीका केली. एक दोन वाक्यांपलिकडे ते ममतादीदींवर बोलले नाही. उलट तिस-या आघाडीचा आणि काँग्रेसचा त्यांनी खरपूस समाचार घेतला.
मोदी म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये 35 वर्षे डाव्या पक्षांची सत्ता राहिली आहे. त्यांनी विकासाऐवजी 'बंद'च अधिक केले. पश्चिम बंगालच्या जनतेने परिवर्तनासाठी ममता बॅनर्जींना निवडले आता, केंद्रातील परिवर्तनासाठी भाजपला विजयी करा.
तिस-या आघाडीची आज दिल्लीत बैठक झाली, त्यांना उद्देशून मोदी म्हणाले, जरा इकडेही लक्ष द्या आणि पाहा वारे कोणत्या दिशेने वाहात आहे.
बंगलच्या जनतेला मोदींची तिहेरी ऑफर
मोदी म्हणाले, बंगालच्या जनतेने भाजपला निवडले तर त्यांचा तिहेरी फायदा होणार आहे. तुम्ही येथे ममता बॅनर्जींना निवडले. त्या येथे परिवर्तन करतील. मला दिल्लीसाठी निवडून द्या, मी तिथून तु्मच्या विकासासाठी काम करले. आणि माझ्यावरती प्रणव दा बसलेले आहेत. अशा पद्धतीने तुमचा तिहेरी फायदा आहे.
कोलकत्यात मोदींनी स्टाइल बदलली
कोलकोत्यात मोदींनी पहिली काही मिनिटे लिखित भाषण वाचले. त्यांनी बंगाली भाषेत उपस्थितांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी भाषणाला सुरवात केली. भाषणाच्या मधे-मधेही त्यांनी बंगालीचा वापर केला.
मोदींनी 'आप'ची लाइन वापरली
मोदी म्हणाले, यावेळच्या निवडणूका वेगळ्या आहेत. सगळे अंदाज यंदा चूकणार आहेत. यंदा राजकीय पक्ष निवडणूका लढत नाहीत, तर 'आम आदमी' निवडणूक लढत आहे.
दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारात आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल देखील हाच मुद्दा भाषणातून मांडत होते. ते म्हणत होते, की निवडणूक मी किंवा आपचे उमेदवार लढवत नाहीत तर दिल्लीची जनताच निवडणूक लढवीत आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर शपथ ग्रहण समोरोहातही त्यांनी संपुर्ण दिल्लीची जनता आज मुख्यमंत्री झाली आहे, असे म्हटले होते.
कोलकत्यात मोदींनी गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांच्या ओळीही वाचून दाखविल्या. गुरुदेव टागोराच्या ओळी त्यांनी इंग्रजी आणि बंगाली दोन्ही भाषेत सांगितल्या. तसेच त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचाही नारा दिला. सुभाषबाबूंच्या 'तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा' या ऐतिहासिक आवाहनाप्रमाणे मोदींनी पश्चिम बंगालच्या जनतेला, 'तुम मुझे साथ दो, मै तुम्ही सुराज्य दुंगा', असे आवाहन केले.
प्रणवदांना पंतप्रधानपद नाकारले
पश्चिम बंगालमध्ये आल्यानंतर नरेंद्र मोदी यांना प्रणव मुखर्जी यांचीही आठवण झाली. ते म्हणाले, इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर पश्चिम बंगाल मधील नेत्याला पंतप्रधानपदाची संधी दिले गेली पाहिजे होती. मात्र तसे झाले नाही. 2004 साली युपीएला बहुमत मिळाले होते. तेव्हा सर्वांनी सोनिया गांधी यांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती त्यांनी ती फेटाळली. मात्र तेव्हाही त्यांनी प्रणवदा यांना पंतप्रधानपद नाकारले आणि मनमोहनसिंगांना पंतप्रधान केले.
ममतांवर टीका
पश्चिम बंगालचे लोक क्रांतिकारक असतात, असे सांगत मोदी म्हणाले, पश्चिम बंगालच्या लोकांनी परिवर्तनाची हाक दिली आणि परिवर्तन घडवून आणले मात्र, या परिवर्तनाने काही साध्य झाले का, असा सवाल उपस्थित करीत त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. यापुढे भाजपला साथ देऊन पश्चिम बंगलचा विकास करण्याची संधी द्या, असे आवाहन केले.

पुढील स्लाइडमध्ये, छायाचित्रातून पाहा, भाजपची कोलकत्यातील जनचेतना रॅली