आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Spoke Person Vijay Bahadur Pathan Commented On Mulayamsingh Yadav

कारसेवकांवर गोळीबार, मुलायम यांनी माफी मागावी : भाजप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी १९९० मध्ये अयोध्येत कारसेवकांवर गोळीबार करण्याचा आदेश दिल्याबद्दल रविवारी खेद व्यक्त केला होता. मात्र मुलायमसिंह यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपने सोमवारी केली.

उत्तर प्रदेश भाजपचे प्रवक्ता विजय बहादूर पाठक म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी ज्या कारसेवकांवर गोळ्या चालवल्या, ते नि:शस्त्र होते. त्यांच्यावर गोळीबार करण्याचा आदेश देऊन गंभीर गुन्हा केला. घटनेनंतर २५ वर्षांनी त्याबाबत खेद व्यक्त करून ज्या कटुंबांतील लोक बळी गेले त्यांच्या जखमा भरून निघणार नाहीत. मुलायमसिंह यांना त्याबद्दल या गुन्ह्यासाठी सार्वजनिक मंचावरून माफी मागावी. दरम्यान केंद्रीयमंत्री रामविलास पासवान यांनी या मुद्द्यावर मुलायमसिंह यांच्यावर टीका केली. मुलायम यांनी गोळीबाराचा आदेश तेव्हा कुणाच्या तरी दबावाखाली दिला होता, असे लक्षात येते, असे ते म्हणाले
परंतु उशीराने का होईना माफी मागून त्यांनी त्यांची चूक सुधारली आहे.

जुनी मढी उकरू नका : काँग्रेस
अयाेध्येत कारसेवकांवर केलेल्या गोळीबारप्रकरणी खेद व्यक्त करणारे मुलायमसिंह जुनी मढी उकरून काढत आहेत. मुस्लिम मतदारांना एक करण्याचा व भाजपला हिंदू मतांच्या ध्रुवीकरणाचा लाभ व्हावा, असा त्यांचा डाव आहे. परंतु अशा वादात जनतेचे हित नाही, असे काँग्रेसचे माजी मंत्री सत्यदेव त्रिपाठी म्हणाले.