आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BJP ने EC कडे केली राहुलची तक्रार, म्हणाले होते शंकर, महावीर, नानकांच्या फोटोत दिसतो 'पंजा'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ - यूपी भाजपीने निवडणूक आयोगाकडे राहुल गांधींच्या विरोधात तक्रार केली आहे. राहुल गांधींनी लोकांच्या बावना दुखावल्या असल्याचा आरोप भाजपने केला आहे. राहुल गांधी 11 जानेवारीला दिल्लीच्या जन वेदना सम्मेलनात हिंदू, जैन, बौद्ध, शीख धर्माच्या प्रतिकांमध्ये काँग्रेसचे चिन्हं असल्याचे म्हटले होते. 

म्हणाले, शिवजी, महावीर, नानकजींच्या फोटोत दिसते काँग्रेसचे चिन्हं..
- राहुल गांधींनी 11 जानेवारीला दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये जन वेदना सम्मेलनात भाषण केले होते. 
- यावेळी राहुल गांधींनी दोन वेळा भाषण केले. संध्याकाळी केलेल्या भाषणात राहुल म्हणाले की, मला माहिती होते की, काँग्रेस पार्टी 100 वर्ष जुनी आहे. एक दिवस मी फोटो पाहत होतो तर, मला शिवजींच्या म्हणजे शंकराच्या फोटोत काँग्रेसचे निवडणूक चिन्हं दिसले. बुद्धांचा फोटो पाहिला तर त्यातही काँग्रेसचे चिन्हं, महावीलांच्या फोटोतही दिसले. 
- मी करण सिंहांना विचारले सगळीकडे काँग्रेसचे चिन्हं पंजा का दिसत आहे. त्यावर ते म्हणाले, वर्तमान परिस्थितीत सत्याचा सामना करा. आपल्या अस्तित्वाला घाबरू नका. 
- मी मित्रांना भेटलो आणि म्हणालो, घाबरू नका, काँग्रेसचा विचार सांगतो घाबरू नका. दुसरा एक विचार मात्र घाबरा आणि घाबरवा असे सांगतो. 
- भाजपचे लक्ष्यच घाबरवणे हे आहे. दोन तीन महिन्यांत या लोकांनी संपूर्ण भारतात भिती पसरवली आहे. आम्ही म्हटले होते, 100 दिवसांची गॅरंटी देतो. आम्ही सांगितले तुमची जमीन तुमचीच राहील. 

मोदी भीती पसरवत आहेत.. 
- राहुल म्हणाले, मोदी म्हणाले होते की ही आमची जमीन आहे. कोणी आदिवासी म्हणतो की, माझी जमीन आहे, जंगल आहे, त्याला गोळी मारून मारले जाते. छत्तीसगड, मध्यप्रदेशात असेच करतात. 
- भाजपचे जे स्ट्रक्चर आहे, ते भीतीला रागात पसरवण्याचे स्ट्रक्चर आहे. आम्ही सांगतो की, घाबरण्याची गरज नाही. 
- या देशातील लोक जागरूक आहेत. त्यांना कोणत्याही गोष्टीला घाबरायची गरज नाही. ते शेतकरी, मजुरांना घाबरवतात तेव्हा  त्याचा अर्थ ते देशाचा मान राखत नाहीत. 

यूपीच्या मुख्य निवडणूक आयुक्तांचीही तक्रार 
- यूपीचे चीफ इलेक्शन ऑफिसर टी. व्यंकटेश यांनीही राहुल गांधींच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला होता. त्यात म्हटले होते की, प्रत्येक देवात त्यांना काँग्रेसचे चिन्हं दिसते. 
- व्यंकटेश यांनीही राहुल गांधींच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)