आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bjp Suspends Mla Pralhad Gunjal Who Abused Cmo In Rajasthan

CMO ला शिविगाळ करणारे भाजपचे आमदार गुंजल निलंबित, मोदींच्या सांगण्यावरून कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- राजस्थानमधील कोटाचे भाजपचे आमदार प्रल्हाद गुंजल यांच्यावर पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे. आमदार गुंजल यांच्यावर सीएमओला ‍अर्वाच्च भाषेत शिविगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर दखल घेतली असून त्यांनी दिलेल्या निर्देशांनुसार आमदार गुंजल यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

राजस्थान मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी आमदार गुंजल यांच्या विरोधात चौकशीचे आदेश दिले आहे. आमदार गुंजल यांची एक ध्वनिफीत समोर आली होती. त्यात ते कोटाचे सीएमओ डॉ. आर.एन.यादव यांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ आणि धमकी देत असल्याची माहिती मिळाली आहे. गुरुवारी ही ध्वनिफीत व्हायरल झाली होती. यानंतर गुंजल यांनी सीएमओ डॉ. यादव यांची माफी मागितली होती. मात्र, कॉंग्रेसने याप्रकरणी जोरदार गदारोळ केला. यावर भाजपचे ज्येष्ठ नेते व्यंकेया नायडू यांनी आमदार गुंजल यांना पक्षाने निलंबित केल्याचे जाहीर केले.

सीएमओने दिला होता राजीनामा...
आमदार गुंजल यांनी सीएमओ डॉ. आर.एन. यादव यांना धमकी दिल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या पार्श्वभूमीवर डॉ.यादव यांना पोलिस सुरक्षा देण्यात आली आहे.

गुंजल यांची सारवासारव...
आमदार गुंजल यांनी यांनी स्वत:चा बचाव करताना सांगितले की, त्यांनी डॉ.आर.एन. यादव यांना शिविगाळ केल्याचे कबूल केले आहे. मात्र, डॉ.यादव यांना धमकी दिल्याचे वृत्त त्यांनी फेटाळून लावले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, सीएमओंना काय म्हणाले होते आमदार गुंजल?