आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BJP चा \'तीन तलाक\'चा चेहरा बेनझीर अरफानला बाहेरचा रस्ता, यामुळे केले पक्षातून निलंबित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजपने मुस्लिम महिला नेत्याला रोहिंग्यांच्या मदतीसाठी पुढे आल्या म्हणून निलंबित केले. - Divya Marathi
भाजपने मुस्लिम महिला नेत्याला रोहिंग्यांच्या मदतीसाठी पुढे आल्या म्हणून निलंबित केले.
गुवाहाटी - आसाममध्ये रोहिंग्या मुस्लिमांसाठी प्रार्थना सभेचे आयोजन करणाऱ्या भाजप नेत्याला पक्षाने निलंबित केले आहे. त्यासोबत या महिला नेत्याला कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. बेनझीर अरफान या भारतीय जनता मजदूर मोर्चाच्या चीफ एक्झिकेटिव्ह होत्या. आसाममध्ये पक्षाच्या त्या मुस्लिम चेहरा म्हणून ओळखल्या जातात. तीन तलाक प्रकरणात त्या राज्यात कायम पक्षाची बाजू मांडत होत्या. त्यांच्यावर आरोप आहे की त्यांनी दुसऱ्या संघटनांच्या आंदोलनांसाठी भाजपच्या मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला. यासाठी त्यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडे विचारणाही केली नाही. याआधी बेनझीर यांनी राज्यात तीन तलाकविरोधात आंदोलन केले होते. आपल्या निलंबनाबाबत त्या म्हणाल्या ही फक्त प्रार्थना सभा होती. आता परत कधीही भाजपमध्ये जाणार नाही, असा निर्धारही बेनझीर यांनी केला आहे. माझ्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे आहे, आता नरेंद्र मोदींनीच मला न्याय द्यावा, असेही बेनझीर म्हणाल्या. भारतामध्ये अवैधरित्या राहाणाऱ्या 40 हजार रोहिंग्या मुस्लिमांना परत पाठवण्याचे भारत सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. 
 
माझ्या प्रामाणिकपणाचा हाच पुरस्कार का? 
- भाजपच्या निलंबनाच्या कारवाईवर बेनझीर संतप्त झालेल्या आहेत. एका इंग्रजी दैनिकाला त्यांनी सांगितले, 'अल्पसंख्याक समाजाच्या एकजुटीसाठी एका एनजीओने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात म्यानमारमधून आलेल्या रोहिंग्या मुसलमानांसाठी प्रार्थना करण्यात आली होती. मात्र भाजप नेतृत्वाला वाटत आहे की भारतात अवैधरित्या राहाणाऱ्या रोहिंग्यांसाठी हे लॉबिंग होते. या कार्यक्रमाच्या एक दिवस आधी (16 सप्टेंबर) मला पक्षाने निलंबित केले.'
- मी प्रामाणिकपणे भाजपचे काम केले होते. त्याचे हेच बक्षिस आहे का, असा सवाल बेनझीर यांनी उपस्थित केला. त्यासोबतच राज्य भाजपमध्ये फक्त पुरुष कार्यकर्त्यांनाच महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जातात महिला निवडून बाजूला केले जाते, असाही आरोप त्यांनी केला आहे. 
- बेनझीर यांनी 2012 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना जनिया विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र त्यात विजय मिळाला नव्हता. प्रचारादरम्यान, त्या स्टेजवर मोदींसोबतही झळकल्या होत्या. 
बातम्या आणखी आहेत...