आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Take U Turne On Artical 370, Let Do Discussion To Benefit Narendra Modi

कलम 370वर भाजपची गिरकी,काय लाभ झाला यावर चर्चा होऊ द्या - नरेंद्र मोदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणा-या घटनेतील 370 व्या कलमाला विरोध करणा-या भाजपने आता नरमाईची भूमिका घेतल्याचे स्पष्ट होत आहे. पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी येथील जाहीर सभेत 370 व्या कलमाला असलेला विरोध सोडून देण्याची तयारी दाखवली. या कलमामुळे राज्याचे खरेच भले झाले आहे काय, यावरही चर्चा व्हायला हवी, असे मोदी म्हणाले. दरम्यान, कलम फायद्याचे ठरले असेल तर भाजपही त्याला पाठिंबा देईल, असे पक्षाध्यक्ष राजनाथसिंह म्हणाले.
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा असल्याने देशातील प्रचलित कायदे राज्यात लागू होत नाहीत. त्यामुळे भाजपचा जनसंघाच्या काळापासून या कलमाला विरोध होता. यावर मोदी म्हणाले, ‘आतापर्यंत 370 व्या कलमाचा वापर कवचकुंडलासारखा झाला. याला धार्मिकता व जातीयवादाशी जोडले जात आहे. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली सरकारने कायम जबाबदारी झटकली. यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.’ नेहरूंची विचारसरणी योग्य की श्यामाप्रसाद मुखर्जी यांची, हा प्रश्न आहे.
फायद्याचे ठरले असेल तर पाठिंबा देऊ : राजनाथ
उमर अब्दुल्ला काश्मीरबाहेर विवाह
करतात, पण त्यांचे नागरी अधिकार कायम राहतात. त्यांची बहीण साराने असे केले तर तिचे संपुष्टात येतात. महिलांबाबत भेदभाव का?
राज्यात भ्रष्टाचार फोफावला आहे.
अटकाव करणारा कायदाच राज्यात नाही. सेपरेट स्टेटपेक्षा सुपर स्टेटचे स्वप्न लोकांना दाखवले असते तर बरे झाले असते.
चीन खेडुतांना फुकट सिमकार्ड वाटत सुटला असताना केंद्र मात्र झोपलेले आहे. आपले दूरसंचार खाते हे काम का करू शकत नाही?
दहशतवाद्यांशी लढताना जवान शहीद
झाले. मात्र, यावर अजूनही दिल्ली सरकारचे डोळे उघडलेले नाहीत.
राज्यात पर्यटनाला वाव असतानाही पर्यटक हिमाचलला प्राधान्य देत आहेत. राज्यात एखादी चित्रपट संस्था का स्थापन होऊ शकली नाही?
जाहीरनाम्यातही मुद्दा आणू : संघ
नवी दिल्ली । कलम 370 वर भाजपची भूमिका बदललेली नाही किंवा त्यावर नरमाईही नाही, असे रा. स्व. संघाने म्हटले आहे. प्रसिद्धी विभागाच्या एका नेत्याने म्हटले की, मोदींनी हा मुद्दा पुन्हा चर्चेत आणला आहे. यामुळे भाजपच्या बाजूने वातावरण तयार होईल. जाहीरनाम्यातही हा मुद्दा सामील केला जाईल, असेही हा नेता म्हणाला.
मोदींचा दावा खोटा : उमर
मोदींनी भाषणात केलेले दावे धादांत खोटे असल्याचे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. राज्यात पर्यटनही वाढले असल्याचे सांगून बोलण्यापूर्वी सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करा, असा सल्लाही त्यांनी मोदींना दिला. भाजपच्या सभेला या पक्षाने केलेल्या दाव्यापेक्षा अत्यंत कमी गर्दी होती, असा दावा अब्दुल्ला यांनी केला.