आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP To Go Solo In 2017 UP Assembly Elections: Naqvi

यूपीत २०१७ मध्ये होणाऱ्या विधानसभेसाठी स्वबळावर लढणार : नक्वी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बरेली/रामपूर - उत्तर प्रदेशमध्ये २०१७ मध्ये होणाऱ्या विधानसभेसाठी आघाडी करण्याची शक्यता केंद्रीय मंत्री आणि भाजप उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नक्वी यांनी फेटाळून लावली. पक्ष स्वबळावर निवडणूक लढवेल, अशी माहिती त्यांनी दिली.

नक्वी म्हणाले, ‘राज्यातील जनता सपा सरकारमुळे त्रस्त आहे. कायदा-सुव्यवस्था मोडकळीस आली आहे. पोलिस गुन्हेगारांपुढे लाचार आहेत. सपा सरकारमध्येही वाद आहेत. जनतेला विकास हवा असून जनता भाजपकडे अपेक्षेने पाहत आहे.’ काँग्रेस पक्ष भ्रष्टाचाराची जननी आहे, असा आरोप त्यांनी केला. काँग्रेसने देशाच्या विकासाचे अपहरण केले आहे. साम्राज्यवादी मानसिकता असलेल्या काँग्रेसला देशाचा विकास नको आहे.