आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक हजार तरुण भाजपशी जोडा मोदींसोबत चहा घ्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कानपूर - गुजरातचे मुख्यमंत्री व भाजपच्या निवडणूक प्रचार समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा फायदा उठवण्यासाठी भाजपकडून निरनिराळ्या क्लृप्ता लढवत आहेत. 1000 तरुणांना पक्षाचे सदस्य करणा-या कार्यकर्त्यास नरेंद्र मोदी यांच्यासोबत चहा पिण्याची संधी मिळेल. तसेच 500 पक्ष सदस्य करणा-याला पक्षाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांची भेट मिळेल, अशी घोषणा उत्तर प्रदेश भाजपने केली आहे.

भाजपच्या कानपूर विभागाचे अध्यक्ष बालचंद मिश्रा यांनी सांगितले की, नव्या सदस्यांना जोडण्यासाठी आठ जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली असून त्यासाठी 15 सप्टेंबर मुदत देण्यात आली आहे. आपआपल्या भागातील जास्तीत जास्त विद्यार्थी, तरुणांना पक्षाचे प्राथमिक सदस्य करावे, अशा सूचना नेत्यांना दिल्या आहेत. नवे सदस्य 18 ते 35 वयोगटातील असणे अपेक्षित आहे. त्याआधी आंध्र प्रदेशमध्ये मोदी यांच्या सभेसाठी पाच रुपये नोंदणी शुल्क ठेवण्यात आले होते.