आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘...तर ममतांचे केस ओढून त्यांना बाहेर काढले असते’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - भाजपच्या पश्चिम बंगाल शाखेचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी नोटाबंदीच्या विरोधात तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जींबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. घोष म्हणाले की, ‘एक मुख्यमंत्री पंतप्रधानांबद्दल अशा शब्दांचा वापर करत असेल तर ते ठीक नाही. जेव्हा त्या दिल्लीत नाटक करत होत्या, तेव्हा आमची इच्छा असती तर आम्ही त्यांचे केस ओढून त्यांना बाहेर काढू शकलो असतो. तेथे आमचे पोलिस आहेत.’

झारग्राम येथे घोष म्हणाले की, ममतांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. नोटाबंदीमुळे हजारो कोटी रुपये गेल्याने त्या रडत आहेत. त्यामुळेच त्या दिल्ली, पाटणा येथे गेल्या होत्या. आम्हाला वाटले की त्या अखेर गंगेत उडी मारतील. त्यांचा वेडेपणा पाहू शकत नाही. त्यांना सत्तारूढ करण्याची चूक जनतेला समजली आहे.
बातम्या आणखी आहेत...