आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Will Come To Power In Uttar Pradesh In 2017: Amit Shah

उत्तर प्रदेशात भाजप सरकार येईल : अमित शहा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यात भाजपला विजय मिळेल आणि पक्ष सरकार स्थापन करेल, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे.

२०१७ मधील निवडणुकीत भाजपला निश्चितपणे बहुमत मिळेल, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. ते गुरुवारी पत्रकारांशी बोलत होते. प्रदेश भाजपच्या कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या उद््घाटनाच्या निमित्ताने ते येथे आले होते. मला राजकारणाबद्दल बोलायची इच्छा नाही; परंतु राष्ट्रवादावर मला बोलायला आवडेल. जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणता येईल का, असा प्रश्न मला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना करायचा आहे. त्यांनी आपल्या पक्षाची विचारसरणी स्पष्ट करावी आणि माझ्या प्रश्नावरील मौन सोडावे.