आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गाईची वाहतूक करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याची हत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उडुपी (कर्नाटक) - गोरक्षकांनी केलेल्या हल्ल्यात भाजपचा एक कार्यकर्ता ठार झाला, तर एक जण जखमी झाला. ही घटना उडुपी जिल्ह्यातील हेबरी या गावाजवळ बुधवारी रात्री घडली. हल्लेखोर गोरक्षक विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते असल्याचे म्हटले जात आहे.
उडुपीचे जिल्हा पोलिस अधीक्षक के. टी. बालकृष्णा यांनी सांगितले की, प्रवीण पुजारी (२८) आणि अक्षय देवडिगा (२०) हे दोघे एका वाहनातून तीन गाई घेऊन निघाले होते. त्या वेळी विहिंप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला आणि धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर वार केले. या घटनेत पुजारी जागीच ठार झाले, तर देवडिगा यांना ब्रह्मावर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याप्रकरणी १७ जणांना अटक करण्यात आली असून आणखी काही लोकांचा शोध सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर उडुपी जिल्ह्यात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

व्यावसायिक वाद असावा : गृहमंत्री
दरम्यान, ही घटना जनावरांच्या व्यवसायाशी संबंधित वादातून घडली असावी, अशी शक्यता कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी व्यक्त केली. ही घटना जातीय वादातून घडली असावी, असे सध्यातरी वाटत नाही. त्यामागे काही कारणे असू शकतात. आम्ही ती शोधून काढू. त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होईल.
बातम्या आणखी आहेत...