आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Workers Clash Saharanpur Shown Black Flags Laxmikant Bajpai

भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांवर फेकल्या खुर्च्या, प्रदेशाध्यक्षांना दाखवले काळे झेंडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सहारनपूर (उत्तर प्रदेश) - येथे आयोजित भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमात आज (शुक्रवार) कार्यकर्ते आपसातच भिडले. दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत लाथा-बुक्यांची बरसात आणि खुर्च्यांची मोडतोड झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी यांना काळे झेंडे दाखविण्यात आले. परिस्थितीवर नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले.
उत्तर प्रदेशमध्ये 13 सप्टेंबर रोजी विधानसभेच्या दहा जागांसाठी पोट निवडणुक होणार आहे. त्यासाठी भाजपची तयारी सुरु आहे. साहरनपूर येथील भाजप उमेदवार राजीव गुंबकर यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे आज प्रदेशाध्यक्ष वाजपेयी यांच्या हस्ते उदघाटन होते.
कार्यालयाच्या उदघाटनानंतर जेव्हा गुंबकर भाषणासाठी उभे राहिले तेव्हा कार्यकर्त्यांचा एक गट हातात काळे झेंडे घेऊन तिथे दाखल झाला. काहींनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्व प्रयत्न व्यर्थ होते. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोरासमोर आले आणि त्यांनी कार्यक्रमासाठी आणलेल्या खुर्च्या एकमेकांवर फेकण्यास सुरवात केली. महिला देखील यात मागे नव्हत्या.
प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयींविरोधात राग
भाजप कार्यकर्ते कमलजीत सिंह यांचे म्हणणे आहे, की पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी प्रदेशाध्यक्ष वाजपेयी यांच्याकडे तिकीटाची मागणी केली होती. कमलजीत यांचा आरोप आहे, की वाजपेयी यांची त्यांच्यासोबतची वागणूक आक्षेपार्ह्य होती. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते संतप्त झाले. सूत्रांची माहिती आहे, की येथील खासदारांनी त्याचे बंधू राहुल आणि कमलजीत यांना तिकीट देण्याची मागणी केली होती.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, उदघाटन कार्यक्रमातील खुर्ची फेक