आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bjps Fact Finding Team Detained In Violence Hit Malda

बंगाल हिंसा: भाजपच्या सत्य शोधन समितीला मालदा स्टेशनवर रोखले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालदा (पश्चिम बंगाल) - कालियाचक हिंसाचार प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी तीन सदस्यांची सत्य शोधन समिती स्थापन केली होती. समिती सदस्य सोमवारी सकाळी घटनास्थळाकडे निघाले होते, मात्र पोलिसांनी त्यांना रेल्वेस्टेशनवरच रोखले. भाजपने या कृत्याचा विरोध केला आहे.

भाजप नेते एस.एस. अहलूवालिया, भूपेंद्र यादव आणि बी.डी. राम यांना मालदा रेल्वेस्टेशनवर व्हीआयपी प्रतीक्षालयात थांबवण्यात आले आहे. तिन्ही सदस्य लवकरच कोलकात्याला परत येतील.
काय म्‍हणते भाजप...
- भाजप नेते एस.एस. अहलूवालिया, भूपेंद्र यादव आणि बी.डी. राम यांना मालदा स्टेशनच्‍या व्‍हीआयपी लाउंजमध्‍येही थांबवण्‍यात आले.
- तीनही नेते आता कोलकात्‍याला परत जाणार आहेत.
- आम्‍ही वस्‍तुस्‍थ‍िती जाणून घेण्‍यासाठी आलो होतो. परंतु, खरे काय ते कळू नये, यासाठी आम्‍हाला थांबवण्‍यात आले.
- भाजपचे प्रवक्‍ता नलीन कोहली म्‍हणाले, मालदा जाण्‍यापासून बंगाल सरकार का रोकत आहे ? सत्‍यता बाहेर येण्‍याची त्‍यांना भीती आहे का ?
- गृहमंत्री राजनाथ सिंह हेसुद्धा 18 जानेवारीला मालदा जिल्‍ह्याचा दौरा करू शकतात.
- पश्चिम बंगालमध्‍ये याच वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत.
मालदामध्‍ये काय झाले होते ?
- 3 जानेवारीला कालीचकमध्‍ये जवळपास 2.5 लाख लोक रस्‍त्‍यावर आले होते.
- मुस्‍लीम संघटना ईदारा-ए-शरिया विरुद्ध हिंदू महासभेच्‍या नेत्‍यांनी हा मोर्चा काढला होता.
- याच वेळी जमावाने कालीचक पोलिस ठाण्‍याला आग लावली होती.

का वाढला वाद?
- यूपीचे कॅबिनेट मंत्री आजम खान यांनी 29 नोव्‍हेंबरला आरएसएसविरुद्ध वादग्रस्‍त विधान केले होते.
- त्‍यानंतर कमलेश तिवारी यांनी मोहम्मद पैगम्बर यांच्‍या बाबत वक्‍तव्‍य केल्‍याचे सांगितले जाते.
- तिवारी यांचे वक्‍तव्‍य सोशल मीडियावर व्‍हायरल झाले होते.
- 2 डिसेंबरला सहारनपूरमधील देवबंदमध्‍ये या विरुद्ध आंदोलन झाले.
- नंतर यूपी, राजस्थान आणि एमपीसह अने राज्‍यात मोर्चा निघाला.
- 2 डिसेंबरला कमलेश तिवारी यांना लखनौ येथून अटक करण्‍यात आली.