आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Blackback Case: Not Carrying Weapons, Salman Said

अवैध शिकार प्रकरण: शस्त्रे बाळगल्याचा सलमानकडून इन्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - अवैध शस्त्रास्त्र बाळगणे व शिकार केल्याच्या प्रकरणात बॉलिवूड अभिनेता सलमान खानने जोधपूर न्यायालयात लेखी जबाब नोंदवला. त्यात त्याने आपण कधीच अवैध शस्त्रे बाळगली नाहीत व कधी शिकारदेखील केली नाही, असा दावा सलमानने केला आहे. अवैध शस्त्रास्त्रे प्रकरणात सलमावनवरील आरोपांवर मुख्य सत्र न्यायाधीशांपुढे अंतिम युक्तिवाद सुरू होते. त्या वेळी सलमानच्या वकिलांमार्फत सादर केलेल्या जबाबात त्याच्यावरील आरोप फेटाळून लावले. याप्रकरणी पुढील सुनावणी २९ जानेवारी रोजी होणार आहे. या शिवाय काळवीट शिकार प्रकरणात पुढील सुनावणी ९ व १० फेब्रुवारीला होणार आहे. १९९८ च्या या अवैध शिकार प्रकरणात सलमानसह अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री नीलम, सोनाली बेंद्रे, तब्बू यांच्यावरही आरोप आहेत.