आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेन्नई सेंट्रल रेल्वेस्टेशनवर दोन स्फोट, एक महिला ठार; स्फोटांचा पंतप्रधानांकडून निषेध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - चेन्नई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर आज (गुरुवार) सकाळी झालेल्या दोन स्फोटांमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय 14 जण गंभीर जखमी आहेत. स्फोटानंतर वेगाने मदत कार्य केले जात आहे. जखमींवर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. पोलिसांनी एका संशयीताला ताब्यात घेतले आहे. तो रेल्वेत लपून बसला असल्याचे सांगितले गेले आहे.
पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी या स्फोटांचा निषेध केला आहे. रेल्वे मंत्री मल्लिकार्जून खारगे यांनी या स्फोटांच्या तपासासाठी केंद्रीय पथक पाठवण्यात येईल असे सांगितले आहे.
रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक 9 वर उभ्या असलेल्या गाडी क्रमांक 12059 गुवाहाटी एक्स्प्रेस मध्ये स्फोट झाले आहेत. सकाळी सात वाजताच्या दरम्यान हे स्फोट झाले. गुवाहाटी एक्स्प्रेसच्या S-4, S-5 डब्यामध्ये स्फोट झाल्याची माहिती आहे. ज्या आसनाखाली स्फोटके ठेवण्यात आले होते त्या आसनावरील 22 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. हे स्फोट कमी तीव्रतेचे असल्याचे पोलिस अधिका-यांनी सांगितले आहे.
स्फोटांचे कारण अजून समजू शकलेले नाही. गृह मंत्री तामिळनाडू पोलिसांच्या सतत संपर्कात आहेत. मंत्रालयाने हे दहशतवादी कृत्य असल्याचे नाकारलेले नाही. पोलिस आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी अजूनही बॉम्ब असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
रेल्वेने मृतांच्या वारसांना एक लाखांची मदत जाहीर केली आहे.
चेन्नई पोलिसांनी 04425357398 हा हेल्पलाइन क्रमांक सुरु केला आहे.
छायाचित्र - @ramyakannan ने स्फोटानंतर डब्याचे हे छायाचित्र ट्विटरवर पोस्ट केले आहे.