आंध्रप्रदेश - पूर्व गोदावरी जिल्ह्यात ओनएनजीसीच्या साईटवर स्फोट झाल्याने मोठ्या प्रमाणात आग पसरली आहे. या आगीमुळे सुमारे 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या आगीमध्ये १० जण गंभीर भाजले आहेत. दरम्यान, सरकारने मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.
पूर्व गोदावरी जिल्ह्यातील एका गावामध्ये असलेल्या गेल (gail) कंपनीच्या पाइपलाइनला ही आग लागली. त्यामुळे आग नियंत्रणात आणणे, अग्निशमन दलाच्या जवानांना कठीण ठरत होते. मात्र पाईपलाइनमधील गॅसचा पुरवठा बंद करून आग आटोक्यात आणण्यात जवानांना यश आले आहे. अग्निशमन दलाचे सुमारे 10 बंब याठिकाणी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, ज्या गावातील पाइपलाइनला ही आग लागली आहे, त्या गावातील गावक-यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. सकाळी पाच वाजेपूर्वीच ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सुमारे वीस ते पंचवीस मीटर उंचीपर्यंत या आगीचे लोट दिसून येत होते.
चौकशीचे आदेश
आंध्रप्रदेशचे अर्थमंत्री वाय. रामाकृष्नाडू यांनी घटनेबाबात पंतप्रधानांना माहिती दिली. पंतपु्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्मंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या प्रकरणी दुःख व्यक्त केले आहे. दरम्यान या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असून, भविष्यात पुन्हा असा प्रकार घडू नये, म्हणून कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले.
फोटो - गॅस पाईपलाइनला लागलेल्या आगीचे लोट
पुढे पाहा - आगीच्या घटनेचे आणि घटनेनंतरचे काही फोटोज