आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Blast In Agra, Two Killed And Three Injourd, News In Marathi

आग्रा येथे सिलिंडरचा शक्तीशाली स्फोट, हॉटेल मालकाच्या दोन मुलींचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आग्रा- बालूगंजमध्ये शनिवारी रात्री हॉटेल रिलॅक्‍सच्या घरात सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटात हॉटेल मालकाच्या दोन मुलींचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये कोलकाता येथील पर्यटकांचा समावेश आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.

विकेंड असल्याने आग्रा येथे पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. या स्फोटामुळे पर्यटकांमध्ये भीती पसरली आहे.

मिळालेली माहिती अशी की, शनिवारी रात्री साडे बाराला बालूगंज चौकातील तीन मजली हॉटेल रिलँक्‍स आहे. हॉटेल मालक सरदार मंजीत सिंह हआणि त्यांचे भाऊ बलजीत सिंह हे हॉटेलमागील घरात राहातात. याच घरात हा स्फोट झाला. यावेळी मंजीत सिंह हे पत्नीसोबत अमृतसर येथे केले होते.

स्फोट होतात कोसळली बाल्कनी...
स्फोट इतका शक्तीशाली होती की, 20 मीटर पेक्षा लांब बाल्कनी खाली कोसळली. घराच्या भींती आणि छताचे मोठे नुकसान झाले.

स्फोटाचा आवाज होताच परिसरात एकच गोंधळ उडाला. पर्यटक हॉटेल सोडून पळू लागले. पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले. बलजीत सिंह, त्यांची पत्नी इंद्रजीत कौर, बेटी नेहा आणि मंजीत सिंह यांची मुलगी सिमरन आणि निक्‍कीला बाहेर काढण्यात आले. परंतु निक्ती आणि सिमरनचा मृत्यू झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्‍यात आहेल. मंजीत सिंह यांचा मुला प्रिंसला बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले.
'रिलॅक्स'मध्ये थांबले होते कोलकात्यातील नऊ लोक...
हॉटेल रिलॅक्‍समध्ये कोलकात्यातील नऊ पर्यटक थांबले होते. स्फोट इतका शक्तीशाली होता की, हॉटेलमधील पर्यटकही जखमी झाले आहेत.

स्फोटात इमारतीचेही मोठे नुकसान झाले आहे. बॉम्ब शोधपथक आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले असून तपास करत आहे. स्फोटाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. स्फोट झाला त्या परिसरात अनेक मोठ्या हॉटेल आहेत. विदेशी पर्यटक याच भागात थांबतात. स्फोटात दोन महिलांचा मृत्यु झाला आहे. तसेच तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन पर्यटकांचा समावेश आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, घटनेची छायाचित्रे...