आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगळुरु स्फोटः सीसीटीव्‍ही फुटेजमध्‍ये दिसला मोटरसायकल उभी करणारा युवक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरु- मल्लेश्वरी भागात असलेल्या भारतीय जनता पक्षाचे कार्यालय जगन्नाथ भवनाजवळ बुधवारी पावणे अकारा वाजेच्या सुमारास शक्तीशाली स्फोट झाला. भाजप कार्यालयाजवळ उभ्या असलेल्या मारुती ओम्नी कारजवळ हा स्फोट झाला. ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्‍या या स्फोटामुळे संपूर्ण शहर हादरले आहे. या स्‍फोटामध्‍ये इंडियन मुजाहिदीनचा हात असल्‍याची शक्‍यता वर्तविण्‍यात येत आहे. आयबीने कर्नाटक सरकारला 4 दिवसांपूर्वीच इशारा दिला होता, अशी माहिती आहे. दरम्‍यान, पोलिसांना घटनास्‍थळाजवळील सीसीटीव्‍ही फुटेज प्राप्‍त झाले असून त्‍यात ओम्‍नी कारच्‍या बाजुला मोटरसायकल उभी करताना एक युवक दिसून आला आहे. मोटरसायकल उभी करुन तो जवळच्‍याच दुकानात गेला. याच मोटरसायकलमध्‍ये स्‍फोटके ठेवण्‍यात आली होती, असा पोलिसांना दाट संशय आहे.

स्फोटात आठ पोलिसांसह सात नागरिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. या स्फोटामुळे परिसरातील तीन गाड्याही जळून खाक झाल्या आहेत. तसेच अनेक मोटारसायकलींचे नुकसान झाले आहे. पोलिस, बॉम्बशोध पथकासह अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटना स्थळी पोहचल्या असून मदत कार्य सुरु झाले आहे. पोलिसांनीही चौकशी सुरु केली आहे. मोटारसायकलवर स्फोटके आणण्यात आल्याचा संशय पोलिस आयुक्ता राघवेंद्र औरादकर यांनी व्यक्त केला आहे. तर दहशतवादी कटाची शक्यता नाकारता येत नसल्याचेही गृहमंत्रालयाने सांगितले आहे.

स्फोटात आयईडीचा वापर करण्यात आल्याचे उघड झाले आहे. स्फोटाचा तपास करण्यासाठी राष्ट्रीय तपास पथकाला (एनआयए) पाचारण करण्‍यात आले आहे.

घटनास्थळी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटचा दिवस असल्यामुळे भाजप कार्यालयाबाहेर लोकांनी खूप गर्दी केली होती.

बंगळुरु येथील स्फोटानंतरची छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा..