आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पानीपत लोकलमध्ये स्फोट, थोड्या वेळाने जाणार होती CM खट्टर यांची ट्रेन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्फोटानंतर बॉम्बशोधक पथकाने प्रत्येक ठिकाणाची तपासणी केली. - Divya Marathi
स्फोटानंतर बॉम्बशोधक पथकाने प्रत्येक ठिकाणाची तपासणी केली.
पानीपत - हरियाणामधील पानीपत रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या एका लोकल ट्रेनमध्ये टायमर बॉम्बचा स्फोट झाला. स्फोटात जिवीत हानी झाली नसली तरी रेल्वेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पोलिसांना घटनास्थळाहून बॅटरी आणि दोन सेल सापडले आहेत. तपास सुरु आहे. रात्री उशिरा गुप्तचर संस्थेची टीम घटनास्थळी पोहोचली.
मुख्यमंत्री खट्टर तर निशाण्यावर नव्हते
- या ट्रेननंतर याच स्टेशनवर कलका शताब्दी एक्स्प्रेस येते. या दोन्ही रेल्वे एकमेकांना क्रॉस करतात. शताब्दीने हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर प्रवास करत होते.
- तपास यंत्रणा आता, हा स्फोट खट्टर यांना लक्ष्य करण्यासाठी तर घडवून आणला नाही, या दिशेने तपास करत आहेत.

केव्हा झाला स्फोट
- स्फोट शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता अंबाला जाणाऱ्या मेमू ट्रेनमध्ये झाला.
- स्फोट झाला तेव्हा रेल्वेमध्ये 10-15 प्रवासी होते. स्फोटानंतर पानीपत रेल्वे स्टेशनवर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.
- पानीपत येथून दररोज जवळपास 30 हजार लोक प्रवास करतात.
- या स्टेशनवरुन एक्स्प्रेस, पॅसेंजर, मालगाडी अशा सर्व प्रकारच्या 180 गाड्या दररोज धावतात.
- स्फोटात एक महिला जखमी असल्याची माहिती आहे, रेल्वे पोलिस तिची अधिक चौकशी करत आहेत.

घटनास्थळी बॉम्बशोधक पथक
- बॉम्बशोधक पथक, श्वान पथक, न्यायवैद्यक पथकाने जवळपास पाच तास घटनास्थळाची पाहाणी केली.
- रेल्वे डब्यातून दोन सेल आणि एक मनगडी घड्याळ सापडले.
- त्यासोबतच आसनाखाली बाइकची 12 व्होल्टची बॅटरी आणि टायमर लावलेले बॉम्ब सापडले.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, आणखी फोटोज्...