आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Blast In Imphal 3 People Dead 4 Injured Reda More At Divya Marathi

इंफाळमध्ये शक्तीशाली स्फोट, 3 ठार तर 4 गंभीर जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(प्रतिकात्मक छायाचित्र )
इंफाळ - मणिपूरची राजधानी इंफाळ येथे आज (ता.21) शक्तीशाली बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला आहे . या बॉम्बस्फोटामध्ये 3 नागरीकांचा मृत्यु झाला असून 4 नागरिक गंभीर जखमी झाले असल्याचे सुत्रांनी सांगितले. खुयाथाँग या भागामध्ये हा स्फोट घडवून आणला आहे.
इम्फाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस डेपोजवळ हा स्फोट झाला आहे. स्फोटात जखमी झालेल्यांची प्रकृति गंभीर असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान स्फोटानंतर परिसरात नाकेबंदी करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहे. अद्याप या प्रकरणी कुणाला ताब्यात घेण्यात आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.