आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्‍य रात्री 50 सिलिंडरचा स्‍फोट, ग्रामस्थांना वाटले पाकिस्‍तानने केला हल्‍ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
याच सिलिंडरचा झाला स्‍फोट - Divya Marathi
याच सिलिंडरचा झाला स्‍फोट
माछीवाडा/लुधियाना ( पंजाब) – मध्‍य रात्र.. निरव शांतता... आणि अचानक एकापाठोपाठ होत असलेल्‍या स्‍फोटांमुळे परिसर हादरून गेला. गाढ झोपलेले जिवाच्‍या अकांताने उठून बसले. काय होतेय, हे कुणालाच कळेना. काहींनी पोलिस ठाण्‍यात कॉल लावला. पण, तिथेही तिच अवस्‍था. त्‍यामुळे पाकिस्‍तानने सीमेपलीकडून बॉम्‍ब हल्‍ला केला, अशीच अफवा पसरली. मात्र, हे स्‍फोट होत होते ते गॅस सिलिंडरचे. एका ट्रकमधून त्‍यांची वाह‍तूक होत होती. सोमवारी रात्री 12 ते 3 वाजतादरम्‍यान ही घटना घडली. यात एकूण 50 सिलिंडरचा स्‍फोट झाला. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.
एका ट्रकमधून 450 सिलिंडरची वाहतूक केली जात होती. दरम्‍यान, रस्‍त्‍यावरील खड्डयांमुळे सिलिंडरचे एकमेकांसोबत घर्षण झाले नि ठिणगी उडून आग लागली. यात तब्‍बल 50 सिलिंडरचा स्‍फोट झाला. दरम्‍यान, चालकाने ट्रक रस्‍त्‍यातच उभा करून पळ काढला. धावत जाऊन जवळच्‍या गावात माहिती दिली. तोपर्यंत गावात पाकिस्‍तानने हल्‍ला केल्‍याची अफवा पसरली होती. जसं जसा सिलिंडरचा स्‍फोट होत होता, तसे तसे घराला हादरे बसत होते. गॅसची दुर्गंधी दूरपर्यंत पोहोचली होती. सर्तकता म्‍हणून परिसरातील एक गाव पूर्णत: खाली करण्‍यात आले.
तब्‍बल 20 गावातील लोक भयभीत
या स्‍फोटांचे हादरे सात किलोमीटरपर्यंत पोहोचले. त्‍यामुळे परिसरातील 20 गावातील नागरिका भयभीत झाले होते. घटनेची माहिती मिळताच नायब तहसीलदार बलविंदर सिंह आणि पोलिस निरीक्षक मुखी जसविंदर सिंह यांनी तत्‍काळ घटनास्‍थळ गाठले. फायर ब्रिगेडच्‍या मदतीने आग विझवण्‍यात आली.
घटनेची भीषणता पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा....