आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोलकात्यात रेल्वेत बॉम्ब स्फोटात 20 जखमी, अलाहाबाद स्थानकावरही स्फोट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - पश्चिम बंगालच्या कोलकात्यात मंगळवारी सकाळी एका लोकल रेल्वेत झालेल्या बॉम्ब स्फोटात 20 जण जखमी झाले आहेत. गँगवारमधून हा प्रकार घडल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, अलाहाबाद रेल्वे स्थानकावरही मंगळवारी एक देशी बनावटीच्या बॉम्बचा स्फोट झाला. हा बॉम्ब एका कचरापेटीत ठेवण्यात आला होता. या स्फोटामुळे एका कुत्र्यांचा मृत्यू झाला असून इतर हानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. स्फोटाच्या काही वेळानंतरच रेल्वे बोर्डाचे अधिकारी रेल्वे स्टेशनचा दौरा करणार होते.
पहाटे चार वाजेच्या सुमारास बैरकपूरमध्ये कृष्णानगरच्या लोकल ट्रेनमध्ये हा स्फोट झाला. दोन गँगमध्ये झालेल्या वादातून एकमेकांवर बॉम्ब फेकण्याचा प्रकार झाल्याची माहिती या प्रकरणात मिळत आहे. घटनेनंतर लगेचच घटनास्थळी फायर ब्रिगेड आणि पोलिस अधिकारी पोहोचले. प्राथमिक चौकशीत पोलिसांनी ही घटना दहशतवादी असल्याचे मानण्यास नकार दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन गंटांमधील वादानंतर त्यांनी एकमेकांवर बॉम्ब फेकल्याने हा स्फोट झाला. जखमींना आरजी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेनंतर बंदुकीसह पळून गेले तिघे-प्रत्यक्षदर्शी
या स्फोटाच्या दरम्यान उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार घटनेनंतर लगेचच घटनास्थळाहून तीन जण बंदुकीसह पळून गेले. तर चौथी व्यक्ती या स्फोटात जखमी झाली आहे. या स्फोटात गंभीर जखमी झालेली ती व्यक्ती सोबत बॉम्ब घेऊन प्रवास करत होती, असेही सांगितले जात आहे. त्याच लोकल रेल्वेत प्रवास करणाऱ्या सुबीर गांगुली नावाच्या एका प्रवाशाने सांगितले की, हा स्फोट अत्यंत जोरदार होता. त्या स्फोटामुळे रेल्वेच्या अनेक बोगींचेही नुकसान झाले. या स्फोटाच्या वेळी स्टेशनवर किंवा रेल्वेत एकही जीआरपी जवान नव्हता असा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंकप सकाळपासूनच सियालदह-बैरकपूर मार्गावर लोकलसेवा बंद करण्यात आली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, घटनेशी संबंधित PHOTO'S