आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Blasts Convicts Write To Victims Families For Help

7/11: दोषींची मदतीसाठी पीडित कुटुंबियांकडे याचना, म्हणाले- खरे गुन्हेगार मोकाट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 11 जुलै 2006 रोजी मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाताली 12 दोषींनी पीडितांच्या कुटुंबियांना एक पत्र लिहिले आहे. यात विनंती करण्यात आली आहे, की पीडित कुटुंबांनी दोषींच्या वतीने मुंबई हायकोर्टात बाजू मांडावी. विशेष न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच या प्रकरणातील 13 पैकी 12 जणांना दोषी ठरविले आहे. त्यांना 30 सप्टेंबर रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.
काय आहे पत्रात
>> बॉम्बस्फोटातील दोषींनी नऊ पानांचे पत्र लिहिले आहे. त्यावर सर्व दोषींच्या सह्या आहेत. त्यात म्हटले आहे, आमची विनंती आहे की तुम्ही हायकोर्टात आमच्यासोबत राहा. कोर्टात एक याचिका दाखल करा आणि त्यात निर्दोषांना नाही तर, खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा होण्याची मागणी करा.

>> पत्रात म्हटले आहे, 12 जणांना दोषी ठरविल्यानंतर तुम्हाला मिळालेले समाधान स्वाभाविक आहे. मात्र तुम्हाला हे सांगताना दुःख होत आहे की तुम्हाला मिळालेले समाधान हे सत्य नाही. कारण आम्हा 12 जणांना ज्या बॉम्बस्फोटासाठी दोषी ठरविण्यात आले आहे त्याला आम्ही जबाबदार नाही. आम्ही देखील पीडित आहोत.

>> पत्रात सर्व दोष पोलिसांना देण्यात आला आहे. 'पोलिसांनी कोर्टात सर्व खोटे पुरावे सादर केले. आमची निर्दोष मुक्तता होईल ते सर्व पुरावे पोलिसांनी एकतर संपवून टाकले किंवा नष्ट केले आहेत. त्यामुळे खरे गुन्हेगार मोकाट आहेत आणि ते आपल्या टार्गेटच्या शोधात आहेत.'

>> शेवटी लिहिले आहे, तुमच्यात आणि आमच्यामध्ये फक्त एवढा फरक आहे की तुमचे आयुष्य दहशतवाद्यांनी उद्ध्वस्त केले आणि आमचे 'खाकी'ने. आम्ही सर्व विनंती करतो की तुम्ही सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करा. निर्णयचा प्रत वाचा, डिफेन्सकडून देण्यात आलेले पुरावे आणि कागदपत्र पाहा, आमचे मोबाइल - कॉल डिटेल्स आणि लोकेशन रेकॉर्ट तपासा. त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल अजून आपल्याला न्याय मिळालेला नाही.'

काय आहे प्रकरण
>> मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटात 188 जण ठार, तर 829 जण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोट खटल्याच्या सुनावणीसाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती. विशेष न्यायाधीश यतीन डी. शिंदे यांनी 11 सप्टेंबर रोजी निकाल दिला. दोषी ठरवलेले सर्व जण स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या प्रतिबंधित संघटनेशी संबंधित असल्याचे म्हटले जाते.

अवघ्या 10 मिनिटांत घडवले स्फोट
11 जुलै 2006 रोजी मुंबईच्या सात उपनगरी रेल्वे गाड्यांच्या प्रथम श्रेणीच्या डब्यांत आरडीएक्स बॉम्बचा स्फोट झाला होता. अवघ्या 10 मिनिटांच्या कालावधीत 7 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. खार रोड-सांताक्रूझ, बांद्रा-खार रोड, जोगेश्वरी-माहीम जंक्शन, मीरा रोड-भाइंदर, माटुंगा-माहीम जंक्शन आणि बोरिवली येथे हे स्फोट झाले.
दोषी ठरलेले 12 आरोपी
कमाल अहमद अन्सारी (37), तनवीर अहमद अन्सारी (37), महंमद फैसल शेख (36), एहतेशाम सिद्दिकी (30), महंमद माजीद शफी (32), शेख आलम शेख (41), महंमद साजीद अन्सारी (34), मुजम्मील शेख (43), सोहेल मेहमूद शेख (43), जमीर अहमद शेख (36), नवीद हुसैन खान (30) आणि असिफ खान (38).

पुढील स्लाइडमध्ये पाहा, काय झाले होते 11 जुलै 2006 रोजी