आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Blind...But Write, Teach Students; Bilaspur Prof.Sav Teaching Work

अंध... तरीही लिहितात, विद्यार्थ्यांना शिकवतात!, बिलासपुरात प्रा. डॉ. साव यांचे अध्यापन कार्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिलासपूर - घरून ऑटोने कॉलेजात जाणे, पाय-या चढून वर्गात पोहोचणे.... फळ्यावर गणित सोडवून एम.एस्सी.च्या विद्यार्थ्यांना शिकवणे... लॅपटॉपवर काम करणे..! विज्ञान महाविद्यालयातील प्रा. डॉ. अवनीशकुमार साव डोळ्यांनी पाहू शकत नाहीत. परंतु सहज वागण्याने ते दृष्टिहीन असल्याचे जाणवत नाही. डोळसांनाही प्रेरणादायी ठरावे, असे अध्यापन कार्य ते 20 वर्षांपासून अविरत करत आहेत. पाय-या, वर्गखोलीची लांबी-रुंदी सरावाने त्यांना पाठ झाली आहे.
एम.एस्सी., एम.फिल., पीएच.डी., प्रवास सुरूच
साव 1989 मध्ये एम.एस्सी. झाले. 1990 मध्ये एम.फिल. केले. 2000 मध्ये गुरू घासीदास विद्यापीठातून पीएच.डी.ची पदवी घेतली. 1990 मध्येच त्यांना प्राध्यापकाची नोकरी लागली.