आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दृष्टी गेली; पण मनात आयएएस होण्याचे स्वप्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जशपूरनगर - छत्तीसगडच्या जशपूरचा रहिवासी अंकुश जैन याची लहानपणीच दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली. मात्र, दृढनिश्चियामुळे कोणत्याही प्रकारे अपंगत्वाचा अडसर आला नाही. त्याने दहावी बोर्ड परीक्षा ८४ टक्के गुणांसह उत्तीर्ण केली. एवढेच नव्हे, तर त्याने गणितात १०० पैकी १०० गुण मिळवले.

अंकुश म्हणाला, माझे स्वप्न आयएएस होऊन देशसेवा करण्याचे आहे. दिल्लीच्या प्रतिष्ठित सिव्हिल सर्व्हिसेस कोचिंग संस्थेत राज्यशास्त्राच्या प्रसिद्ध प्राध्यापिका शुभ्रा रंजन जशपूर येथे आल्यानंतर त्या वडिलांसोबत त्याची भेट घेण्यास आल्या. यूपीएससी परीक्षेसंबंधी माहिती घेतली. यासोबत त्यांच्या संपर्कात राहण्यास सांगितले. अंकुश १२ वी वाणिज्य शाखेतून शिक्षण घेऊ इच्छितो.

बहिणीकडून पुस्तक वाचून घेतो : त्याला वृत्तपत्राच्या माध्यमातून यूपीएससी परीक्षेची माहिती मिळाली होती. तो बहिणीकडून पुस्तक वाचून घेतो आणि त्याचे ध्वनिमुद्रण मोबाइलमध्ये करतो. अभ्यासात कुटुंंबातील सर्व सदस्य मदत करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...