आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंध मुलीची बलात्‍कार करुन हत्‍या, वेदनेने विव्‍हळत मरेपर्यंत पाहत होत आरोपी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुवनेश्‍वर- ओडीशामध्‍ये पुरीजवळ एका अंध अल्‍पवयीन मुलीवर बलात्‍कार करुन तिची निर्दयीपणे हत्‍या केल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे. गेल्‍या वर्षी दिल्‍लीत झालेल्‍या सामुहिक बलात्‍कार प्रकरणाप्रमाणेच हा प्रकार आहे.

ही घटना गेल्‍या बुधवारी घडली होती. बनमाली बारिक नावाच्‍या टॅक्‍सीचालकाने अंध मुलीवर बलात्‍कार केला. बलात्‍कार केल्‍यानंतर पुरावे नष्‍ट करण्‍यासाठी त्‍याने तिच्‍या गुप्‍तांगामध्‍ये लोखंडी रॉड घुसविला. या मुलीचा मृत्‍यूच झाला पाहिजे, यासाठी त्‍याने अनेकवेळा रॉड घुसविला. अखेर तिचा मृत्‍यू झालाच. निर्दयीपणाचा कळस म्‍हणजे, रक्ताच्‍या थारोळ्यात ही मुलगी वेदनेने विव्‍हळत असताना तिचा मृत्‍यू होईपर्यंत तो पाहत उभा होता. तिचा मृत्‍यू झाल्‍याची खात्री पटल्‍यानंतर त्‍याने पलायन केले.

पोलिसांनी बारिक याला अटक केली असून त्‍याने गुन्‍हा कबूल केला आहे. दिल्‍लीमध्‍येही 16 डिसेंबररोजी धावत्‍या बसमध्‍ये अशाच प्रकारे बलात्‍कार केल्‍यानंतर लोखंडी रॉड तिच्‍या गुप्‍तांगात घुसविला होता. त्‍यामुळेच तिचा मृत्‍यू झाला होता.