आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ब्लू व्हेल'चा नाद आता मोठ्यांमध्येही; केरळात 22 वर्षीय व्यक्तीसह 2 जणांच्या आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनेटवरील प्रत्येक प्लॅटफॉर्मवर ब्लू व्हेल बॅन करणारा भारत जगातील पहिला देश बनला आहे. - Divya Marathi
इंटरनेटवरील प्रत्येक प्लॅटफॉर्मवर ब्लू व्हेल बॅन करणारा भारत जगातील पहिला देश बनला आहे.
तिरुअनंतपुरम - भारतासह जगभरात शंभरहून अधिक अल्पवयीनांचा बळी घेणारा ब्लू व्हेलचा नाद आता मोठ्यांनाही लागला आहे. यात केरळच्या एका 22 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली आहे. याच राज्यातील आणखी एका कुटुंबाने जीवघेण्या गेममुळे आपला 16 वर्षीय मुलगा गमावल्याचा दावा केला. विशेष म्हणजे, केंद्र सरकारने ब्लू व्हेल चॅलेंज हा गेमवर बंदी लावली आहे. इंटरनेटवरील प्रत्येक प्लॅटफॉर्मवर ब्लू व्हेल बॅन करणारा भारत जगातील पहिला देश बनला आहे.
 
 
16 वर्षीय मुलाची आत्महत्या
- केरळच्या राजधानीतील विलापिलासला गावात राहणाऱ्या एका कुटुंबाने आपला मुलगा ब्लू व्हेलमुळेच गमावल्याचा दावा केला. येथील मनोज सी. मनु (16) याने फासावर लटकून आपला जीव दिला. त्याला ब्लू व्हेल गेमचा नाद लागला होता.
- त्याच्या आईने सांगितल्याप्रमाणे, "काही दिवसांपूर्वीच तो माझ्याकडे येऊन सांगत होता, की एक गेम आहे, त्यामध्ये शेवटच्या स्टेजला एकतर मरावे लागते, किंवा एखाद्याला मारावे लागते. तेव्हाच मी त्याला असले प्रकार बंद करण्यासाठी रागावले होते."
- नोव्हेंबरपासून तो हा गेम खेळत होता. त्याने आपल्या अंगावर विचित्र खुना मारल्या होत्या. 26 जुलै रोजी त्याने आत्महत्या केली. 
 

मोठ्यांनाही लागला नाद
- केरळच्या कुन्नूर जिल्ह्यात एका 22 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. कित्येक दिवसांपासून तो एकटाच राहून हॉरर मूव्हीज पाहत होता. 
- सावंत नामक या युवकाला ब्लू व्हेलचे वेड लागले होते. त्याने आपल्या हातावर, छातीवर आणि इतर ठिकाणी अनेक प्रकारचे घाव कोरले होते. रात्रभर तो गेम खेळत होता असे त्याच्या आईने सांगितले आहे. 
- अल्पवयीनांमध्ये ब्लू व्हेलचा नाद लागून आत्महत्या किंवा आत्महत्येच्या प्रयत्नाचे प्रकार घडले आहेत. मोठ्यांमध्ये ब्लू व्हेलच्या नादाची भारतातील ही पहिलीच घटना मानली जात आहे. 
 
 
काय आहे ब्लू व्हेल चॅलेंज?
ब्लू व्हेल गेम एक ऑनलाईन चॅलेंज आणि स्मार्टफोन गेम आहे. त्यामध्ये 50 दिवसांत गेमर्सला 50 टास्क दिले जातात. त्यामध्ये पहाटे लवकर उठणे, एकट्यात हॉरर मूव्हीज पाहणे, नवीन ठिकाणी जाणे आणि हातावर ब्लेडने व्हेल मासाचा आकार बनवण्यासह विविध स्टेप्स आहेत. त्या प्रत्येक स्टेपला एक सेल्फी पाठवावा लागतो. शेवटच्या स्टेपमध्ये गेमरला आत्महत्या करून चॅलेंज पूर्ण करावे लागते. हा गेम रशियात बनवण्यात आला आहे. ते तयार करणारा सध्या तुरुंगात आहे. विविध देशांमध्ये यावर बंदीची मागणी केली जाते. भारत यावर बंदी लावणारा पहिला देश ठरला आहे.
बातम्या आणखी आहेत...