आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्ल्यू व्हेल गेम मृत्यूचा सापळा; रात्री स्मशानात जाऊन घ्यावा लागतो सेल्फी- पीडित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुद्दुचेरी - सुसाइड गेम ब्ल्यू व्हेलच्या जंजाळातून बाहेर आलेल्या एकाने बुधवारी त्याचा भयावह अनुभव शेअर केला. त्याने युवकांना या खेळापासून दूर राहाण्याचे आवाहन केले आहे. तो म्हणाला हे मृत्यूचे व्हर्च्यूअल जाळे आहे. हा खेळ खेळणे जीवघेणा अनुभव ठरु शकतो. ज्यांना हा खेळ खेळण्याची इच्छा आहे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की यामुळे तुम्ही निर्बुद्ध होऊन विचार कराल. गेल्या दोन महिन्यात ब्ल्यू व्हेल गेमने देशात 9 बळी घेतले आहे. रशियामध्ये तयार झालेल्या या गेमने भारत, अमेरिका, चीनसह विविध देशातील 130 जणांना आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे.  
- ब्ल्यू व्हेल गेम खेळणाऱ्या अलेक्झांडरला (22) मंगळवारी पोलिसांनी वाचवले. त्यानंतर या विद्यार्थ्याने मीडियासमोर या गेमचा भयावह अनुभव कथन केला. सध्या त्याचे कॉन्सलिंग सुरु आहे. 
 
फक्त गेमची लिंक पाठवली जाते
- अॅलेक्झांडरने सांगितले, 'गेम खेळण्यासाठी मला एका व्हॉट्सअॅप ग्रुपवरुन लिंक आली होती. या ग्रुपमध्ये माझे अनेक मित्र होते. दोन आठवड्यानंतर मी ऑनलाइन गेम खेळण्यास सुरुवात केली. हा काही डाऊनलोड होणारा एखादा अॅप नाही, याची फक्त एक लिंक ब्ल्यू व्हेल अॅडमिनकडून यूजरला येते.'
 
स्मशानातून सेल्फी पाठवण्याचे चॅलेंज
- अलेक्झांडरने सांगितले, 'अॅडमिनकडून यूजरला रोज एक टास्क दिला जातो, तो त्याला रात्री 2 नंतर पूर्ण करायचा असतो. सुरुवातीचे काही दिवस वैयक्तिक माहिती आणि फोटो मागवले जातात. त्यानंतर खरा खेळ सुरु होतो. मला एक दिवस मध्यरात्रीनंतर स्मशानाजवळ जाऊन सेल्फी घेण्याचे चँलेंज देण्यात आले होते. हा फोटो ऑनलाइन पोस्ट करायचा होता. अॅडमिनने दिलेले टास्क पूर्ण करण्यासाठी दररोज स्मशानाजवळ जाऊन घेतलेले सेल्फी पाठवत होतो. त्यानंतर मला एकट्याने भीतीदायक चित्रपट पाहाण्यासा सांगण्यात आले. हे तुमच्यातील भीती मारण्यासाठी करायला सांगितले जाते.'
 
स्वतःला खोलीत बंद करुन घ्यावे 
- 'काही दिवसानंतर मला घरात कोणाला घ्यायचे नाही आणि स्वतः रुमच्या बाहेर जायचे नाही असे सांगण्यात आले. हे तुम्हाला मानसिकरित्या कमकुवत करण्यासाठी केले जाते. तेव्हा मी गेम सोडण्याचा निश्चिय केला. कारण मी हे सर्व करु शकत नव्हतो. जवळपास दोन आठवड्यांनी माझ्या भावाच्या वर्तणुकीतही असाच बदल जाणवू लागला. त्याचे रोजचे वागणे पाहून तोही यात अडकत चालल्याचे जाणवले. एका रात्री 4 वाजता मी पोलिसांना फोन करुन बोलावून घेतले. तेव्हा तो बंद खोलीत हातात चाकू घेऊन ब्ल्यू व्हेलची इमेज तयार करत होता.'
 
#ब्ल्यू व्हेल गेम नाही ट्रॅप
- टीन एजर्स गेम समजून याच्या जाळ्यात अडकत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये मुले सोशल मीडियावर ब्ल्यू व्हेल गेम आणि अॅप सर्च करत आहे, मात्र हा गेम नाही किंवा अॅप नाही. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे हे जाळे आहे. ज्याने आतापर्यंत जगभरातील 130 पेक्षा जास्त मुलांचा बळी घेतला आहे. 
 
#कुठे तयार झाला ब्ल्यू व्हेल 
- ब्ल्यू व्हेलमागचे डोके हे रशियन आहे. या गेमची अॅडमिन मॉस्कोची मानसशास्त्राची विद्यार्थीनी फिलिप बुडेईकिनला नुकतीच अटक करण्यात आली. तिला तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 
- गेममुळे मृत्यू झाल्याचे पहिले प्रकरण 2015 मध्ये घडले होते. अटक करण्यात आलेल्या फिलिपने म्हटले होते, गेमचा उद्देश समाजाच्या स्वच्छतेचा आहे. फिलिपच्या दृष्टीने आत्महत्या करणारे सर्व जण समाजाचे बायो-वेस्ट (जैविक कचरा) होते.

#कसा खेळला जातो गेम 
- अॅडमिनकडून प्लेयरला 50 दिवस रोज वेगवेगळे टास्क दिले जातात. टास्क पूर्ण झाल्याचे फोटो शेअर करावे लागतात. सुरुवातीचे टास्क हे सोपे असतात मात्र हळुहळु टास्क खतरनाक होत जातात. शेवटी प्लेयरला अशा आवस्थेला नेऊन ठेवले जाते की अॅडमिनने दिलेला शेवटचा आत्महत्येचा टास्क पूर्ण करण्यासाठी तो शरीर आणि मनाने तयार झालेला असतो.  
बातम्या आणखी आहेत...