आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Blue Whale: Youth Committed Suicide In Front Of The Train To Complete The Last Task

तो रेल्वेसमोर गुडघे टेकवून बसला; ब्ल्यू व्हेलचे टास्क पूर्ण करण्यासाठी केली अात्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 दमोह  - मध्य प्रदेशातील दमोह येथे ११ वीच्या विद्यार्थ्याने शनिवारी रात्री १२ वाजता सुसाइड गेम ठरलेल्या ब्ल्यू व्हेल चॅलेंजमध्ये शेवटचे टास्क पूर्ण करण्यासाठी रेल्वेसमोर आत्महत्या केली. तो रेल्वेसमोर गुडघे टेकवून बसला होता. त्याचा मृतदेह छिन्नविच्छिन्न झाला होता. त्याच्या हातावर खूण दिसून आलेली नाही.
 
ब्ल्यू व्हेल गेमचा मध्य प्रदेशातील हा पहिला बळी ठरला आहे. तत्पूर्वी जुलै महिन्यात इंदूरमध्ये एका विद्यार्थ्यांने तिसऱ्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो बचावला.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दमोह येथे काम करणारे संजय पांडे यांचा मुलगा सात्त्विक नवजागृती शाळेत ११ व्या इयत्तेत शिकत होता. रविवारी सकाळी त्याचा मृतदेह फुटेरा रेल्वे फाटकाजवळ  आढळला.
 
पोलिस अधीक्षक विवेक अग्रवाल यांनी सांगितले, सात्त्विकचा मोबाइल लॉक असल्याने त्याची तपासणी करण्यात येत आहे. सेंट जोन्स शाळेतील सात्त्विकचा मित्र रोहित याने सांगितले, पाच दिवसांपूर्वी सात्त्विकने ब्ल्यू व्हेल गेम खेळत असल्याचे सांगितले होते. दुसऱ्या मित्राशी यावर चर्चा केलेली होती. या गेममध्ये ५० टास्क पूर्ण करायचे असतात. शेवटच्या टास्कमध्ये धावत्या रेल्वेसमोरून जायचे असते किंवा वेगाने वाहणारी नदी ओलांडून जायचे असते.   
 
२७ शहरात सर्च, ७ दिवस गुगलवर ट्रेंड
हा गेम मध्य प्रदेशातील २७ शहरात सर्च केला गेला. गेल्या ७ दिवसात ब्ल्यू व्हेल गेमशी संलग्न ट्रेंडमध्ये विशेष बदल दिसून आले. इंदूर, भोपाळ, ग्वाल्हेर, जबलपूरसारख्या शहरासह छतरपूर, शहाडोल, कटनी, होशंगाबाद, भिंड, शिवपूरी, सतना आणि खरगोनसह मध्य प्रदेशातील २७ शहरात हा गेम सर्च केला गेला. हा ट्रेंड २७ ऑगस्टपासून ३ सप्टेंबरपर्यंतचा आहे. छतरपूर येथे हा गेम सर्वाधिक पाहिला गेला. 
 
देशात तीन दिवसांत तिसरा व आतापर्यंतचे ७ बळी  
- १ सप्टेंबर : गुजरातच्या बनासकांठा येथे २० वर्षीय अशोक मुलाणा याने साबरमती नदीत उडी टाकून आत्महत्या केली  
-  ३१ ऑगस्ट : पुद्दुचेरी येथे २३ वर्षीय एमबीएचा विद्यार्थी शशिकुमार बोरा याने वसतिगृहाच्या खोलीत फाशी घेतली.  
- ३० ऑगस्ट : तामिळनाडूच्या मदुराई येथेे विग्नेशने फाशी घेतली. तो बी. कॉम. चा विद्यार्थी होता.  
-  ३० जुलै : मुंबईत १४ वर्षांच्या मनप्रीत साहनीने ५व्या मजल्यावरून उडी टाकली. 
बातम्या आणखी आहेत...