आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मिरमध्ये झळकले 'मोदी आर्मी'चे पोस्टर्स, भाजपकडून कडक कारवाईची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - काश्मीरमध्ये 'भारतीय मोदी आर्मी'चे (बीएमए) पोस्टर झळकल्यानंतर भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. पक्षाने पोलिस आणि बीएमएवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे बीएमएचे म्हणणे आहे, की ही मोदी फॅन्सची ही सात वर्षांपूर्वीची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. यात 14 लाख कार्यकर्ते जोडलेले आहेत, जे मोदींच्या धर्मनिरपेक्ष इमेजचे रक्षण करत आहेत.
सोमवारी जम्मू-काश्मीरमध्ये सुरु झाले होते ऑफिस
- मीडिया रिपोर्टनुसार, भाजपने काश्मीरचे पोलिस महासंचालक जावेद मुज्तबा गिलानी यांना पत्र पाठवून 'बीएमए'विरोधात तक्रार दाखल केली आहे.
- 'बीएमए'च्या पदाधिकाऱ्यांना वेळीच अटका केला पाहिजे, अशी भाजपने मागणी केली आहे.
- मात्र, गिलानी यांनी असे पत्र मिळाल्याचे सपशेल नाकारले आहे.
- 'बीएमए'ने सोमवारी श्रीनगरचय्या राजबाग भागात आपल्या संघटनेचे कार्यालय सुरु केले होते.
- भाजपने म्हटले आहे, की बीएमएसोबत आमचा काही संबंध नाही. कार्यकर्त्यांनी त्यांच्या जाळ्यात अडकू नये असे आवाहनही करण्यात आले आहे.
- भाजपचा आरोप आहे की काही गुंड प्रवृत्तीचे लोक बीएमए नावाने एक संघटना चालवत आहेत. त्यांच्या संघटनेचे काम काय आहे हे देखिल अजून स्पष्ट झालेले नाही.
- जे कोणी मोदींच्या नावाचा चुकीचा वापर करत असतील, त्यांचा लवकरच पर्दाफाश केला जाईल, असे भाजपचे जम्मू-काश्मीरचे प्रदेश सचिव अशोक कौल यांनी सांगितले.

काय आहे बीएमए
- हिंदूस्तान टाइम्सच्या वृत्तानूसार, बीएमएच्या संस्थापक सदस्यांपैकी एकाने म्हटले आहे, की आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चाहते आहोत. आमचे मिशन मोदींचे कार्य त्या लोकांपर्यंत पोहोचवणे आहे ज्यांना त्यांच्या कामाची माहिती नाही.
- बीएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव आहूजा म्हणाले, 'आमच्या संघटनेला तुम्ही भाजपशी जोडून पाहू नका. मध्यप्रदेश, उत्तर प्रदेशसह 19 राज्यांमध्ये आमची संघटना आहे.'
- आमची संघटना सात वर्षांपूर्वीची असून आंतरराष्ट्रीय पातळीची आहे. यात 14 लाख कार्यकर्ते आहेत. यातील 1.5 लाख विदेशातील आहेत.
- आहूजा यांच्या फेसबुक वॉलवर त्यांचे मोदींसह अमित शहांसोबत फोटो आहेत.

'भाजपचा आम्हाला पाठिंबा'
- आहूजा म्हणाले, राज्यातील भाजप नेते भलेही आमच्याशी काही संबंध नाही असे म्हणत असले तरी केंद्रातील अनेक नेत्यांची आमच्यावर 'कृपा दृष्टी' आहे.