आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑपरेटरचे फोनवर गुफ्तगू, एअरोब्रीज धडकला विमानाला, प्रवासी सुखरूप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एअरोब्रिज विमानाला धडकल्याने फ्युजलेज क्षतिग्रस्त झाले. - Divya Marathi
एअरोब्रिज विमानाला धडकल्याने फ्युजलेज क्षतिग्रस्त झाले.
चेन्नई - येथील विमानतळावर गो एअरचे विमान एअरोब्रिजला धडकले आहे. विमानात 168 प्रवासी आहेत. या अपघातामुळे विमानाचे नुकसान झाले आहे, मात्र प्रवासी किंवा क्रू मेंबरला इजा झालेली नाही.
धडक दिल्याने विमानाच्या फ्लूजलेजचे (प्रमुख भाग) नुकसान झाले आहे. डीजीसीएच्या सूत्रांच्या माहितीनूसार, एअरोब्रीजचा ऑपरेटर काम करत असताना फोनवर बोलत होता. चेन्नई विमानतळाच्या डायरेक्टरने सांगितले, की डीजीसीएने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे.

कशी झाली दुर्घटना
गो एअरचे विमान ए 320 मुंबईहून चेन्नईला आले होते. एअरोब्रिजचा ऑपरेटर त्याला अलाइन करण्यासाठी वेगाने पुढे आला, तेव्हा एअरलाइनचा स्टाफ त्याला थांबवत होता. परंतू ऑपरेटर फोनवर बोलत असल्याने त्याचे त्याकडे लक्ष गेले नाही. एअरोब्रिज आणि विमानाच्या धडकेत विमानाच्या फ्युजलेजचे मोठे नुकसान झाले. (फ्युजलेज हा भाग फोटोत दाखवण्यात आला आहे) त्यामुळे प्रवाशांना दुसऱ्या मार्गाने बाहेर काढण्यात आले.
एअरोब्रिजला जेटब्रिज किंवा बोर्डिंग ब्रिज देखील म्हटले जाते. हे एक मुव्हेबल कनेक्टर असते. याद्वारे विमानतळच्या गेटला विमानाच्या प्रवेशद्वारासोबत जोडले जाते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, संबंधीत फोटो
बातम्या आणखी आहेत...