आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाटणा : किनाऱ्यापासून 30 फुटावर तुटली नाव, 20 सेकंदात अनेकांना मिळाली जलसमाधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - याठिकाणी एनआयटी घाटाजवळ शनिवारी सायंकाळी एक नाव गंगा नदीत बुडाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात बुडालेल्या 21 जणांचे मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात आले आहेत. त्यामध्ये काही लहान मुलांचाही समावेश आहे. अनेक लोक अद्याप बेपत्ताही आहेत. हा अपघात NIT घाटाजवळ घडला.
(नाव बुडाल्याचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ पाहा, अखेरच्या स्लाइडवर.)
 
मकर संक्रांतीच्या निमित्ताने गंगा नदीच्या पलिकडे पतंगबाजी सुरू होती. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली होती. नावेतही क्षमतेपेक्षा जास्त लोक बसलेले होते, त्यामुळे किनाऱ्यापासून जवळपास 30 फूट लांब असताना ही नाव मोडली आणि बुडाली. नावेतील लोक ओरडत राहीले पण कोणीही काही करू शकले नाही. अवघ्या 20 सेकंदांमध्ये 21 लोकांचा बुडाल्याने मृत्यू झाला. अनेक लोक पोहून बाहेरही आले. घटनास्थळी मदतीची काहीही व्यवस्था नसल्याने लोकांनी चांगलाच गोंधळ घातला. 
 
असा झाला अपघात.. 
1# केव्हा झाला अपघात? घाटावर का उपस्थित होते लोक?
- हा अपघात शनिवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास झाला. त्यावेळी लोक पतंगबाजी उत्सवात सहभागी होऊन घरी परतत होते. 
- दुपारीच याठिकाणी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. गर्दी जास्त झाल्याने पोलिसांनी लाठीचार्ज करावा लागला होता. 

2# नावेत किती लोक होते? का झाला अपघात?
- प्रशासनाला असलेल्या अपेक्षेपेक्षा अधिक लोक गंगेच्या पलिकडे सबलपुर दियारा येथे आले होते. त्यांना पोहोचवणाऱ्या नावांची संख्या मात्र कमी होती. 
- पतंगबाजी उत्सव संपल्यानंतर लोकांना लगेचच परतायचे होते. त्यामुळेच नाव ओव्हरलोडही झाली. 
- सबलपुर दियाराहून परतताना नाव 25 मीटर लांब जाताच पाण्यात वाकडी होऊ लागली. त्यानंतर नावेतून धूरही बाहेर आला. 
- किनाऱ्यावर उपस्थित असलेले लोक नाव मधून तुटली असल्याचे ओरडत होते. एक दोघांनी नावेतून पाण्यात उडी मारली. 
- नावेत वेगाने पाणी भरले आणि पाहता पाहता नाव बुडाली. किनाऱ्यावरील दोघांनी लगेचच इतरांचे प्राण वाचवण्यासाठी नदीत उडी मारली. किनाऱ्यावरून जॅकॅट्सही फेकण्यात आले. 
- हजारो लोकांच्या गर्दीसमोर अवघ्या 20 सेकंदाज हा अपघात घडला. 

3# अपघातानंतर काय घडले?
- काही लोक पोहत पाण्याबाहेर आले. ज्यांना थोड्या फार प्रमाणात पोहता येत होते, त्यांना किनाऱ्यावर असललेल्या लोकांनी पाण्यातून बाहेर काढले. 
- अपघातानंतर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरू असलेले पाहायला मिळाले. बुडणाऱ्यांना वाचवण्यासाठी त्यांच्याकडे लाइफ जॅकेट्स फेकण्यात आले. त्याशिवाय काहींनी बुडणाऱ्यांना वाचण्यासाठी पाण्यात उड्या मारल्या. 
- काही लोक पोहून घाटापर्यंत आले पण बहुतांश लोक बुडाले. 
- मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घटनेच्या तपासाचे आदेश दिले आहेत. आरोग्य विभागाच्या मुख्य सचिवांना जखमींच्या तातडीने उपचाराच्या सूचना दिल्या आहेत. 
- मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा करण्यात आली आहे. 
- जदयूने या अपघातानंतर रविवारी आयोजित केलेला दही-चूजा भोद कार्यक्रम रद्द केला आहे. 
- गंगेच्या किनारी रविवारी नितीश कुमार आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचा एक कार्यक्रम होता. तो कार्यक्रमही रद्द करण्यात आला. 

4# लोकांनी गोंधळ का घातला?
- ज्या लोकांचे आप्तेष्ट या अपघातात मृत पावले त्यांनी अपघाताच्या दोन तासांनंतर NDRF आणि SDRF च्या टीम घटनास्थळी पोहोचल्याचा आरोप केला. त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले असे ते म्हणाले. दुसरीकडे लोकांनी घटनास्थळी अॅम्ब्युलन्स उपलब्ध नसल्याने आणि नंतर रुग्णालयात लोकांना योग्य उपचार मिळत नसल्याच्या मुद्द्यावरूनही गोंधळ घातला. 
 
5# काय म्हणाले प्रत्यक्षदर्शी ?
- पाटणा अपघाताचे एक प्रत्यक्षदर्शी विपुल यांनी आमच्याशी बोलताना सांगितले की, मी चार मित्रांबरोबर आलो होतो. पण परतताना फार गर्दी झाली होती. मी ज्या नावेवर होतो त्या नावेवर 60 लोक होते. मी आणि एख मित्र नावेतून उतरलो पण इतर त्या नावेवरच होते. 
- नाव नदीत काही अंतरावर जाताच बुडाली. काही लोक पोहून परत घाटापर्यंत आले मात्र अनेक बुडाले. 
- दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, बोटवर क्षमतेपेक्षा अधिक लोक होते. बुडालेल्या नावेतही जास्त लोक होते. 

6# पुढे काय?
- मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. तपासाची जबाबदारी डिझास्टर मॅनेजमेंट विभागाचे सेक्रेटरी जनरल प्रत्यय अमृत, पाटणाचे डीआयजी शालीन आणि डीएम संजय कुमार अग्रवाल यांच्यावर सोपवण्यात आली आहे. 
- नदीच्या किनाऱ्यावर आयोजित केलेल्या मकर संक्रांतीच्या या कार्यक्रमात आयोजकांनी काय व्यस्था केली होती, याची माहिती हे तपास पथक घेईल. 
- नावेत एवढे लोक कसे प्रवास करत होते? नावेत लाइफ जॅकेट्स होते का? किती लाइफगार्ड्स उपस्थित होते? याचीही माहिती घेतली जाणार आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, अपघातानंतरचे PHOTOS अखेरच्या स्लाइडवर पाहा नाव कशी बुडाली याचा व्हिडीओ...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)