आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या वृक्षाखाली बुद्धाला झाली होती ज्ञानप्राप्ती, सम्राट अशोकाच्या पत्नीने तोडले होते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पवित्र बोधीवृक्ष - Divya Marathi
पवित्र बोधीवृक्ष
पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीचे काउंटडाऊन सुरु झाले आहे. divyamarathi.com बिहार निवडणुकीसंबंधी प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे. त्यासोबतच आम्ही सुरु केलेल्या 'बिहार फ्लॅशबॅक' मालिकेत बिहार संबंधी तुम्ही कधीही पाहिले नाही असे बिहार तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. या मालिकेत आज पाटण्यापासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या बोधगयाविषयी.
बोधगया येथील बोधीवृक्षाखाली गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली होती. त्यानंतर त्यांना भगवान बुद्ध म्हटले जाऊ लागले होते. इतिहासकारांच्या मते बोधगयेत आता जे बोधीवृक्ष आहे ती याची चौथी पीढी आहे. 2002 मध्ये यूनेस्कोने या शहराला जागतिक वारसास्थळ घोषित केले.

भगवान बुद्धांनी 2630 वर्षांपूर्वी जगाला शिकवला त्याग, दिला शांतीचा मार्ग

जवळपास इसवी सण पूर्व 2630 मध्ये राजकुमार सिद्धार्थ गौतमाने जगातील दुःख निराकरणासाठी मोह, माया राजवैभवाचा त्याग केला आणि दुःखाचे मुळ काय आहे याचा शोध सुरु केला. हा शोध घेत असतानाच ते बोधगया येथे पोहोचले. येथे पाच वर्षे तपस्या केल्यानंतर एका पिंपळवृक्षाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. दुःखाचे कारण तृष्णा असल्याचे त्यांनी जगाला सांगितले आणि तृष्णेचा त्याग केला तर तुम्ही दुःखी होणार नसल्याचा मार्ग त्यांनी जगाला दिला. यानंतर त्यांना भगवान बुद्ध संबोधले जाऊ लागले.

ज्ञान प्राप्तीनंतर त्यांनी जगाला शांती, अहिंसाचा संदेश दिला. स्वतःच स्वतःचा मार्ग शोधण्याचा (अत्तं दिप भवं) मौलिक विचार त्यांनी विश्वाला दिला. चीनचा प्रवासी ह्युयान सांगने त्याच्या प्रवास वर्णनात बोधगयाच्या प्रसिद्ध विहाराला महाबोधी विहार हे नाव असल्याचा उल्लेख केलेला आहे.
सम्राट अशोकाला बोधीवृक्षाबद्दल होता विशेष आदर
कलिंगच्या युद्धानंतर बौद्ध विचारांनी प्रभावित होऊन बौद्धधम्माचा स्विकार करणाऱ्या सम्राट अशोकाला बोधीवृक्षा बद्दल विशेष आस्था होती. त्यांच्या अनेक शिलालेखांवर बोधीवृक्ष कोरलेले आढळून येते. मात्र त्यांच्या पत्नीला हे पंसत नसल्याचे काही इतिहासकारांचे मत आहे. त्यांच्यानूसार सम्राट अशोकाच्या पत्नीने हा वृक्ष तोडण्यास सांगितला होता.

बख्तियार खिलजीने तोडले होते विहार
बोधगया येथे सम्राट अशोकाने तिसऱ्या शतकात येथे पहिले स्तुप बांधले होते. त्यानंतर कुषाण राजा कनिष्क याने येथे एक भव्य विहार निर्माण केले. सण 1205 मध्ये बख्तियार खिलजीने हे विहार उद्धवस्त केले. 1876 मध्ये जनरल कनिंघम आणि बेगलर यांनी येथे केलेल्या खोदकामात त्यांना विहाराचे अवशेष सापडले. त्यानंतर शिल्पकारांच्या मदतीने त्यांनी पुन्हा त्याचे निर्माण केले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, बोधगयेचे फोटो